अरे बापरे..पुण्यात बोअरवेलमध्ये पडला दोन वर्षांचा चिमुरडा
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील टाकळीहाजी इथं दोन वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. शुभम मोरे असं या चिमुकल्याचं नाव आहे. एका शेतात शुभमचे वडील ऊसतोडणीसाठी आले होते. त्याचवेळी खेळता खेळता शुभम शेतातल्या दीडशे ते दोनशे फूट खोल उघड्या बोअरवेलमध्ये पडला.
Feb 23, 2014, 06:05 PM ISTपुणे-नाशिक महामार्गावर अपघात, तीन ठार
पुणे-नाशिक महामार्गावर चाकणजवळ वाशी येथे आज पहाटे कार अपघातात तीन जण ठार झाले आहेत. या अपघातात पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर शरद बोराडे यांचा मुलगा प्रीतम बोराडे याच्यादेखील मृतांमध्ये समावेश आहे.
Feb 22, 2014, 06:21 PM ISTचाकणमध्ये आढळला चक्क सयामी साप
जन्मजात कमरेखालून अवयव जोडलेली सयामी जुळी बालके हा प्रकार आपल्यासाठी नविन नाही, मात्र चाकण परिसरात चक्क सयामी सर्प आढळून आला आहे. या सर्पांचे अवयव एकमेकांत गुंतलेले असण्याचा प्रकार फार दुर्मिळ असून शेपटीपासून मानेपर्यंतचा भाग एकमेकांना चिटकलेला असून पुढे दोन वेगवेगळी तोंडे एकाच दिशेला आहेत.
Feb 21, 2014, 11:24 AM ISTचोऱ्यांचं शतक ठोकून `तो` झाला आऊट!
पुण्यात एका चोराने चक्क चोऱ्यांचं शतक केलंय. त्याचे शंभर गुन्हे करुन झाल्यावर १०१ वी चोरी करताना पोलिसांनी त्याला अटक केलीय.
Feb 20, 2014, 08:25 PM ISTमहापालिकेला जेव्हा 'झोप' येते!
पुणे महापालिकेत आज एक धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार घडलाय. शिवजयंती साजरी करणाऱ्या महापालिकेनं उत्सवादरम्यान शिवाजी महाराजांऐवजी चक्क संभाजी महाराजांचाच फोटो लावला.
Feb 19, 2014, 07:05 PM ISTसेक्स रॅकेट चालवणारी कल्याणी देशपांडे तडीपार
सेक्स रॅकेट चालवणारी, युवतींना फूस लावून वाममार्गास लावणारी जयश्री ऊर्फ कल्याणी देशपांडेसह इतर पाच गुंडांना पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून हद्दपार केले.
Feb 18, 2014, 02:19 PM ISTपुणे-नाशिक महामार्गावर अपघात, ७ ठार
पुणे महामार्गावर रात्री दोन वाजेच्या सुमारास बोटा शिवारात ट्रक आणि बोलेरो पिक-अपमध्ये भीषण अपघातात ७ जण मृत्युमुखी पडले तर ९ जण जख्मी झाले आहेत. मृतांत ३ लहान मुलांचा समावेश आहे.
Feb 17, 2014, 03:13 PM ISTपुण्यातील कचराप्रश्न पेटला, शरद पवार मैदानात
पुण्यातील कचरा कोंडीवर अजूनही ठोस तोडगा निघालेला नाही. मात्र, कचऱ्याच्या प्रश्नावरून आता राजकीय पक्षांची स्टंटबाजी सुरु झालीय..सगळेच पक्ष कचऱ्याच्या प्रश्नावर वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आहेत. दरम्यान, शरद पवार सध्या पुण्यात आहेत. आज संध्याकाळी त्यांनी त्यांनी अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक बोलावलीये.. सर्कीट हाऊसमध्ये पाच वाजता ही बैठक होतीये. गेली अनेक वर्षे प्रलंबीत असलेल्या या कचरा प्रश्नावर पवारांच्या मध्यस्थीनंतर तरी आता तोडगा निघणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.
Feb 15, 2014, 03:45 PM ISTराज ठाकरे यांना मुंबई पोलिसांची नोटीस
राज ठाकरेंना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलीय. कलम १४९ च्या अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची ही नोटीस बजावण्यात आलीय. १२तारखेला राज ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये मुंबईत निघणा-या मोर्च्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज ठाकरेंची असेल असं या नोटीशीत बजावण्यात आलंय.
Feb 11, 2014, 08:09 AM IST'१२ तारखेपासून रास्तारोकोचं नेतृत्व, हिंमत असेल तर अडवा'
निवडणुकीचे दिवस जवळ येतात तसतसे राजकीय पक्षांच्या स्टार नेत्यांकडून सभांचा धडका लागलाय. पुण्यामध्ये राज ठाकरेंची सभा होतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज पुण्यात सभा होतेय. एसपी कॉलेजच्या मैदानात ही सभा होतेय.
Feb 9, 2014, 07:35 PM ISTदहा कोटींच्या एका लग्नाची गोष्ट, राष्ट्रवादीच्या नेत्यांची श्रीमंती
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने आपल्या पुतण्याचं आणि पुतणीचं शाही भाटामाटात लग्न लावलंय.
Feb 9, 2014, 06:35 PM ISTराज आजच्या सभेत या विषयांवर बोलतील?
राज ठाकरे यांच्यासाठी टोलचा मुद्दा सर्वात मोठा आणि महत्वाचा मानला जात असला, तरी राज ठाकरे पुन्हा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतील का? याकडे मनसे, सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागून आहे.
Feb 9, 2014, 02:00 PM ISTराज ठाकरेंच्या सभेसाठी राष्ट्रवादीची वट, मनसेची जय्यत तयारी
राज ठाकरेंच्या पुण्यातल्या रॅलीसाठी मुंबईतही जय्यत तयारी सुरू आहे. जागेचा प्रश्न निकाली निघाल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मुंबईतून लाखोंच्या संख्येनं मनसैनिक पुण्याला जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुंबई-पुणे रस्त्यावरचा एकही टोल भरणार नाही, असा निर्धार मनसेनं केलाय. तसंच पुण्यातल्या या रॅलीचे मुंबईतही जागोजागी होर्डिंग्ज लावण्यात आलेत. दरम्यान, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरेंच्या या सभेसाठी NCP च्या बड्या नेत्याचं वजन वापरल्याची चर्चा आहे.
Feb 8, 2014, 07:23 PM ISTमनसे आक्रमक, राज सभेसाठी टोल भरणार नाही!
टोलच्या मुद्यावरुन राज्यभर तोडफोड करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुण्यातल्या सभेला येताना टोल भरणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी तशी माहिती दिली आहे.
Feb 8, 2014, 04:59 PM ISTराज ठाकरेंच्या सभेचा संभ्रम संपला, सभा एसपी मैदानावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ९ फेब्रुवारी रोजी होणार्या सभेसाठीच्या जागेचा शोध शनिवरी अखेर संपला. आता ही सभा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच एसपी कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. तसं पत्र एसपी कॉलेज प्रशासनाने दिलं आहे. त्यामुळे सभेबाबतच संभ्रम संपलाय.
Feb 8, 2014, 04:29 PM IST