आम आदमीला राज्यात परिवर्तनाची स्वप्नं

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने यश मिळवल्यानंतर आता राज्यातही आम आदमी पार्टीच्या नेत्यांना परिवर्तनाची स्वप्नं पडू लागलीयत. पुणे जिल्ह्यातल्या मावळ लोकसभा मतदार संघात मारुती भापकर किंवा उल्का महाजन या निवडणूक लढवतील, अशी घोषणाच स्थानिक पातळीवर करण्यात आलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 7, 2014, 06:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने यश मिळवल्यानंतर आता राज्यातही आम आदमी पार्टीच्या नेत्यांना परिवर्तनाची स्वप्नं पडू लागलीयत. पुणे जिल्ह्यातल्या मावळ लोकसभा मतदार संघात मारुती भापकर किंवा उल्का महाजन या निवडणूक लढवतील, अशी घोषणाच स्थानिक पातळीवर करण्यात आलीय.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत महाराष्ट्रात चमत्कार घडवू, असा दावा आम आदमी पक्ष करतोय. मावळ लोकसभा मतदार संघात स्वत: निवडणूक लढवू, असा दावा मारुती भापकरांनी केलाय, तर उल्का महाजनही उमेदवार असतील, असं भाकीत भापकरांनी वर्तवलंय.

आप कितीही दावा करत असले तरी आपचा करिष्मा चालणार नाही असं प्रस्थापित पक्ष छाती ठोकपणे सांगतायत. दिल्ली सारखा करीष्मा आम आदमी पक्ष महाराष्ट्रात करेल का हे आत्ताच सांगता येणार नाही. पण आम आदमी पक्षाचे उमेदवार अनेकांच्या मतांना खिंडार पाडणार यात शंका नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.