पुणे

पुण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उद्धवस्त

पुण्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेले सेक्स रॅकेट उद्धवस्त करण्यात पोलिसांना यश आलेय.  

Sep 20, 2017, 07:00 PM IST

बिल वाढवल्याच्या संशयावरुन रुग्णाचा डॉक्टरवर चाकू हल्ला

पुण्यात डॉक्टरने बिल वाढवून लावल्याच्या संशयावरून ७५ वर्षीय रुग्णाकडून उपचार करणाऱ्या डॉक्टवर चाकूने हल्ला करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या सिंहगड रोडवरील नांदेड फाटा येथील सिंहगड स्पेशालिटी या रुग्णालयात सोमवारी सायंकाळी घडला आहे. यामध्ये डॉक्टरच्या पोटावर आणि हाताला जखम झाली असून त्यांना तीन टाके पडले आहेत.

Sep 19, 2017, 02:03 PM IST

मोबाइलने घरातील टीव्ही, फॅन बंद करा

तुमच्या हातातील स्मार्टफोनचा उपयोग केवळ कॉल्स, चॅटींगसाठी नाही तर  घरातील टीव्ही, फॅनही तुम्ही याद्वारे सुरू-बंद करु शकणार आहात. एका पुणेकराने हा शोध लावला असून त्याच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. निरंजन वेलणकर असे या तरुणाचे नाव असून तो एसपी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

Sep 18, 2017, 08:44 PM IST

लोणावळा- पुणे रेल्वे रुळावर सापडला अनोळखी मृतदेह

१६ सप्टेंबर रोजी लोणावळ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गाजवळ एक अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला. याच्याकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याने या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. पुणे लोहमार्ग पोलीस या सदर प्रकरणाचा तपास करीत आहे.

Sep 18, 2017, 12:21 PM IST

खासदार संजय काकडे यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा

सत्ताधारी भाजपला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. भाजपचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलिसांत शनिवारी रात्री ९.३०च्या सुमारास काकडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Sep 17, 2017, 06:45 PM IST

तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी

परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Sep 15, 2017, 10:06 PM IST