मोबाइलने घरातील टीव्ही, फॅन बंद करा

तुमच्या हातातील स्मार्टफोनचा उपयोग केवळ कॉल्स, चॅटींगसाठी नाही तर  घरातील टीव्ही, फॅनही तुम्ही याद्वारे सुरू-बंद करु शकणार आहात. एका पुणेकराने हा शोध लावला असून त्याच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. निरंजन वेलणकर असे या तरुणाचे नाव असून तो एसपी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 18, 2017, 08:44 PM IST
मोबाइलने घरातील टीव्ही, फॅन बंद करा  title=

पुणे : तुमच्या हातातील स्मार्टफोनचा उपयोग केवळ कॉल्स, चॅटींगसाठी नाही तर  घरातील टीव्ही, फॅनही तुम्ही याद्वारे सुरू-बंद करु शकणार आहात. एका पुणेकराने हा शोध लावला असून त्याच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. निरंजन वेलणकर असे या तरुणाचे नाव असून तो एसपी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

निरंजनने शोधून काढलेले डिव्हाइस सहा तास चालत असून त्याची किंमत सात हजार एवढी आहे.  त्याने अॅटॉम हे होम अॅटॉमेशन प्रोडक्ट तयार केले असून या डिव्हाइसने लाइट आणि पंखे बंद करता येतात. या स्मार्टफोनद्वारे सहा उपकरणांना एका युनिटपर्यंत नि करता येते. हे डिव्हाइस अत्यंत स्वस्त असून कोणत्याही स्विचबोर्डोमध्ये बसविता येते.

अकरावीत असताना त्याने ही कल्पना लिहून ठेवली होती.त्यानंतर त्यावर संशोधन सुरू झाले. बारावीत अभ्यासामूळे त्याकडे दुर्लक्ष झाले. पण आता बीएससीमध्ये त्याने हे संशोधन पुर्णत्वास नेले आहे. सध्या महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स लॅब आणि त्याच्या घरात हे डिव्हाइस बसविले असून त्याला स्मार्टफोनला कनेक्ट केलं आहे.  पुढच्या वर्षी हे डिव्हाइस लॉन्च करणार असून त्याने डिव्हाइसच्या कॉपीराईट आणि ट्रेडमार्कसाठीही अर्ज केल्याचे निरंजनने माध्यमांना सांगितले.