पुणे

ओला कारमध्ये प्रसूती झाल्याने महिलेला पाच वर्षे मोफत प्रवास

एका महिलेने ओला कारमधेच मुलाला जन्म दिल्याची घटना घडली. पुणे कोंढवा परिसरात राहणारी किशोरी सिंग ही महिला तिच्या सासूसोबत डोक्टरांकडे कारने निघाली होती. 

Oct 6, 2017, 07:58 AM IST

पुण्यात ४ कुत्र्यांना जिवंत जाळले

माणसाच्या निर्दयीपणाची धक्कादायक घटना पुण्यात समोर आलीय. बाणेर परिसरात २० भटक्या कुत्र्यांचं हत्याकांड घडणवण्यात आलंय. त्यातील ४ कुत्र्यांना जिवंत जाळण्यात आलय, तर १६ कुत्र्यांना विष घालून मारण्यात आलंय. पुण्यातील चतुःश्रुं गी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलीय . 

Oct 5, 2017, 05:37 PM IST

मनसेच्या मुंबईतील मोर्चाला ठाणे, पुणे, नाशिकचीही ताकद

रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने लोकांना सुविधा न दिल्यामुळे एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ निष्पाप लोकांचा बळी गेला. त्यामुळे मनसेने प्रशासनाला जाग आणण्यासाठी ‘संताप मोर्चा’चे आयोजन केलेय. या मोर्चाला ठाणे, पुणे आणि नाशिकची ताकद लावण्यात आल्याची चर्चा आहे.

Oct 5, 2017, 09:44 AM IST

'सहारा'ची बे'सहारा' अँबी व्हॅली पूर्णपणे ठप्प

सहारा समूहाचे प्रमुख सुब्रोतो रॉय हे त्यांच्या जामिनासाठी आवश्यक असलेले पाच हजार कोटी रुपये भरू शकले नाहीत. त्यामुळे सहाराच्या अडचणी वाढल्या असतानाच पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील अँबी व्हॅली पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Oct 4, 2017, 11:18 AM IST

दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात विक्रमी वाहनविक्री

दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात तब्ब्ल नऊ हजार वाहनांची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी पेक्षा वाहन विक्रीत २५ टक्के वाढ झाली आहे. सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण असताना, वाहन विक्रीतील वाढ उद्योग जगताला दिलासा देणारी आहे. 

Oct 3, 2017, 07:06 PM IST

विजयगाथा सुवर्णकमळ विजेत्या कासवाची...

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि कलासंस्कृती परिवार पुणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 'विजयगाथा कासवाची' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

Sep 29, 2017, 04:18 PM IST

पुण्यात २०२१ पर्यंत मेट्रो धावणार

२०२१ च्या आधी मेट्रो मध्ये बसायला मिळेल, असं आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणेकरांना दिलं आहे.

Sep 28, 2017, 03:00 PM IST

पुण्यात सिंहगड रोड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

 हे चोर चेहऱ्यावर रुमाल गुंडाळून सॅन्ट्रो कारमधून आले होते. 

Sep 28, 2017, 01:20 PM IST