पुण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उद्धवस्त

पुण्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेले सेक्स रॅकेट उद्धवस्त करण्यात पोलिसांना यश आलेय.  

Updated: Sep 20, 2017, 07:01 PM IST
पुण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उद्धवस्त title=
संग्रहित छाया

पुणे : शहरात पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेले सेक्स रॅकेट उद्धवस्त करण्यात पोलिसांना यश आलेय. यात रशियन युवतीसह तिघींची सुटका करण्यात आली असून ५ दलाल ताब्यात घेण्यात आलेय.

एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दोन परदेशी आणि दिल्ली येथील एका युवतीकडून मोठ्या रक्कमेच्या पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या पाच जणांविरुद्ध येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सुटका केलेल्या तीन युवतींपैकी एक रशियन तर दुसरी उझबेकिस्तान आणि तिसरी दिल्लीची आहे. याप्रकरणी राहुल तथा राजू, जॉन  तथा प्रकाश शर्मा तथा जतीन चावला, सागर, टोनी आणि सुरेश अशा पाच जणांवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांना माहिती मिळताच सापळा रचला. सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा यांनी हे हायप्रोफाईल रॅकेट उघडकीस आणले. मिळालेल्या माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. यावेळी तीन तरूणी आढळून आल्यात.

राहुल तथा राजू हा या रॅकेटचा सूत्रधार आहे. तो एजंटसच्या मदतीने देशातील तसेच परदेशातील मुलींना अधिक पैशांचे आमिश दाखवून वेश्याव्यवसायाला प्रवृत्त करत होता. या मुलींच्या नावाने विविध हॉटेलमध्ये रूमबुकिंग करून, ग्राहकांना पाठवून आर्थिक फायदा घेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्यातील तरुणींना हडपसर येथील रेस्क्यू होम, महंमदवाडी येथे पाठविण्यात आलेय.