ठाणे

ठाण्याला डेंग्यूचा विळखा

ठाण्यात दिवसेंदिवस तापाचे आणि डेंग्युच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आलीय. 

Aug 31, 2016, 12:17 PM IST

ठाणे महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेची सरशी

महापालिकेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष आणि शिवसेनेची सरशी झालीय. वॉर्ड नंबर 32 अ साठी झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या स्वाती देशमुख यांनी शिवसेनेच्या उमेदवार संगीता घाग यांच्यावर 194 मतांनी विजय मिळवला. 

Aug 29, 2016, 10:50 PM IST

जीएसटी आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव - राज ठाकरे

जीएसटी आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव - राज ठाकरे

Aug 28, 2016, 07:05 PM IST

जीएसटी आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव - राज ठाकरे

जीएसटीच्या आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. उद्या जीएसटी घटना दुरुस्तीला मंजूरी देण्यासाठी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलण्यात आलंय. त्याच्या पूर्वसंध्येला मनसे अध्यक्षांनी हे विधान केलंय. 

Aug 28, 2016, 06:18 PM IST

विनयभंग करणाऱ्या सुरक्षारक्षकाला विद्यार्थिनींची मारहाण

शाळा आणि वर्गही मुलींसाठी असुरक्षित आहेत का असा प्रश्न पडावा अशी घटना घडलीय. ठाणे महापालिकेच्या शाळेत सुरक्षा रक्षकाने दोन मुलींना अश्लील चित्रफीत दाखवून लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या नराधमाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून या मुलींनी आपली सुटका करून घेतली. झी 24 तासच्या बातमीनंतर या शाळेच्या मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षकांना निलंबीत करण्यात आलंय. 

Aug 27, 2016, 09:19 AM IST

दहीहंडी रद्द झाल्याने नागरिकांनी वाटली मिठाई

दहीहंडी म्हटले की डीजेचा दणदणाट, गर्दी आणि वाहतूककोंडी हे ओघाने आले. ज्या परिसरात ही दहीहंडी आयोजित केली जाते तिथे राहणाऱ्या नागरिकांना दरवर्षी हा त्रास सहन करावा लागतो. मात्र, दहीहंडी रद्द झाल्याने नागरिकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

Aug 25, 2016, 07:58 PM IST

ठाण्यात मनसे आयोजक, जय जवान पथकावर गुन्हा दाखल

जय जवान पथक आणि अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत जय जवान पथकानं नऊ थर लावून सलामी दिली.

Aug 25, 2016, 04:54 PM IST

दहीहंडी : मुंबईत पोलिसांकडून अनेकांना नोटीसा, ठाण्याकडे लक्ष

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवर लादलेले निर्बंध झुगारून कोणी न्यायालयाचा अवमान केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Aug 24, 2016, 11:17 PM IST