ठाणे : जय जवान पथक आणि अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत जय जवान पथकानं नऊ थर लावून सलामी दिली.
मनसेच्या दहीहंडीत कोर्टाच्या आदेशाचं सर्रास उल्लंघन झाले. जय जवान पथकाने नऊ थर लावून सलामी दिली. तर आम्ही कोपरीकर या मंडळाने आठ थर लावले. यामध्ये सर्वात शेवटच्या थराला बालगोविंदाचा समावेश होता.
मनसेने नियमांचे उल्लंघन केल्यामुळं पोलिसांनी आयोजक असेलेले मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांना कडक शब्दात समज दिली. त्यानंतर त्यांनी वीस फुटांपर्यंत दहीहंडी खाली आणून फोडली.
पोलिसांनी जाधव यांना कोर्टाचे आदेश पाळण्यासाठी बाजुला नेत समज दिली होती. तसंच बालगोविंदानाही वरती चढू न देण्याची सक्त ताकीद दिली होती.