जीएसटी आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव - राज ठाकरे

जीएसटीच्या आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. उद्या जीएसटी घटना दुरुस्तीला मंजूरी देण्यासाठी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलण्यात आलंय. त्याच्या पूर्वसंध्येला मनसे अध्यक्षांनी हे विधान केलंय. 

Updated: Aug 28, 2016, 06:18 PM IST
जीएसटी आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव - राज ठाकरे title=

ठाणे : जीएसटीच्या आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. उद्या जीएसटी घटना दुरुस्तीला मंजूरी देण्यासाठी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलण्यात आलंय. त्याच्या पूर्वसंध्येला मनसे अध्यक्षांनी हे विधान केलंय. 

आपला जीएसटीला विरोध नाही, पण प्रणालीला विरोध असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. मुंबईच्या स्वायत्ततेच्या हमीशिवाय जीएसटीला सेनेचाही पाठिंबा नसल्याचं सांगत राज ठाकरेंनी शिवसेनेच्या सूरात सूर मिसळलाय. जीएसटी करप्रणाली चांगली आहे पण त्यात केंद्राने करवसुली का करावी? राज्याने कर गोळा करावा आणि मग तो कर केंद्राला द्यावा, असा सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत. 

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजरातीत कसा ट्वीट करतो? असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा भाषेचा मुद्दा उचलून धरला. देशात सरकार सर्व केंद्रशासित करायचे प्रयत्न सुरु करत आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही केंद्राकडे हात का पसरायचे?   

ठाण्यात आज राज ठाकरेंनी दहीहंडी आयोजनाच्या निमित्तानं गुन्हे दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी, खटले दाखल केलेल्या गोविंदांमागे मनसेना खंबीरपणे उभी राहणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय.