ठाणे

अनामिका भालेरावच्या 'हायटेक रिक्षा'ची बातच न्यारी!

अनामिका भालेरावच्या 'हायटेक रिक्षा'ची बातच न्यारी!

Jul 5, 2016, 11:59 PM IST

पाऊसामुळे मुंबई कोलमडली, विकेन्डला समुद्र किनाऱ्यावर मात्र गर्दी

मुसळधार पावसानं मुंबापुरीला अक्षरशः झोडपून काढलंय. सकाळपासून मुंबईच्या प्रत्येक भागात जोरदार पाऊस होतोय. मान्सूनचं आगमन झाल्यापासून पावसाचा जोर सर्वाधिक म्हणावा लागले. दुपारच्या सुमारास पूर्व आणि पश्चिम उपनगरात झालेल्या पावसानं संपूर्ण जनजीवनचं कोलमडलं. सायनजवळ रेल्वे ट्रॅकवप पाणी आलं. तर हार्बर लाईनवर लोकल बंद पडल्यानं वेळपत्रकाचे तीन तेरा वाजले. इकडे मध्य आणि दक्षिण मुंबईतल्या बहुतांश सखल भागात पाणी साचलं. हिंदमाता, गांधी मार्केट, माहेश्वरी उद्यान आणि सायनमध्ये पाणी भरलं. यामुळे रस्ते वाहतुकीचाही बोजवारा उडाला. हवामान खात्यानं पुढचे ४८ तास पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

Jul 2, 2016, 09:24 PM IST

ठाण्यात भींत कोसळून ९ कारचा चक्काचूर

शहरातील घोडबंदर रोडवरील आर मॉल आणि रुनवाल इस्टेटदरम्यान असलेली संरक्षित भींत कोसळून लगतच उभ्या करण्यात ९ गाड्यांचा चक्काचूर झाला. मुसळधार पावसामुळे ही भींत कोसळ्याचे सांगण्यात येत आहे.

Jul 2, 2016, 03:53 PM IST

एटीएम कॅश कलेक्शन कंपनी दरोड्यातील ३ कोटी पोलिसांनी केले जप्त

शहरातील चेक मेट या एटीएम कॅश कलेक्शन कंपनीवर पडलेल्या दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी लुटलेल्या पोलिसांनी ९ कोटी रुपयांपैकी ३ कोटी १२ लाख रुपये जप्त केले आहेत. 

Jul 1, 2016, 01:59 PM IST

काळ्या यादीतील मुबंईतील ठेकेदारांची ठाण्यात कामे, रस्ता कामात वीटा-मातीचा वापर

मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या काही ठेकेदारांची कामे ठाण्यातही सुरु असल्याचं उघडकीस आले आहे.

Jun 29, 2016, 11:59 AM IST

पावसाळा सुरु झाला आणि ठाण्यातील सरकारी रुग्णालय आजारीच

सरकारी रुग्णालया विरोधात नागरिकांची मोठी नाराजी आहे. व्हेंटीलेटर मशीन नाही. सिटी स्कॅन मशीन बंद आहे. त्यामुळं रुग्णांची गैरसोय होत आहे.

Jun 25, 2016, 08:35 AM IST

मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस, रेल्वे विस्कळीत

रात्रभरात झालेल्या मुसळधार पावसानं आजच्या दिवसाची सुरूवात मात्र लेटमार्कनं झालीय. मुंबईतल्या तिन्ही रेल्वे मार्गावरची वाहतूक किमान ३० उशिरानं सुरू आहे.

Jun 21, 2016, 08:10 AM IST

शेजा-यांच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न फसला

ठाण्यातील कोकणीपाडा परिसरात शेजा-यांच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न फसलाय. तीन चोरट्यांनी वर्षभरापासून बंद असलेल्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. 

Jun 13, 2016, 08:04 AM IST