‘रिलायन्स’वर मेहेरबानी का?
ठाण्याच्या किसन नगर भागात महापालिकेची परवानगी न घेता रस्ते खोदून रिलायन्स कंपनीकडून केबल टाकण्यात येतेय. पण रिलायन्सच्या ठेकेदारांचं काम काँग्रेस नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी बंद पाडलं. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर याची चौकशी करून कारवाई करू, असं उत्तर पालिकेकडून देण्यात आलं.
Dec 12, 2013, 08:04 PM IST<B> गाडी घेताय, १ नंबर हवाय? तर काढा चार लाख रूपये! </b>
‘कार परवडली, पण नंबर प्लेट नको...’ अशी सध्या अवस्था झालीय. म्हणजे सामान्य माणसाला झेन, आयटेन, मारूती किंवा इको यासारख्या मोटारगाड्या जेवढ्या किंमतीला पडतात, जवळपास तेव्हढीच किंमत आता १ नंबर प्लेटसाठी मोजावी लागतेय. आवडीच्या नंबरसाठी चार-चार लाख रूपये मोजणारे हौशी कलाकार ठाण्यात आहेत.
Dec 10, 2013, 11:01 PM ISTपप्पू कलानी दोषी, ३ डिसेंबरला सुनावणार शिक्षा
इंदर भटिजा हत्येप्रकरणी पप्पू कलानीला दोषी ठरवण्यात आलंय. कल्याण सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलाय.
Nov 30, 2013, 04:58 PM ISTठाणे-तुर्भे रेल्वेवर ट्रॅफिक ब्लॉक
मध्य रेल्वेच्या ठाणे-तुर्भे मार्गावर जादा लांबीचे रुळ टाकण्यासाठी आजपासून शनिवारपर्यंत दुपारी १२ ते दीड वाजण्याच्या दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. याची ठाणे नवी मुंबई प्रवाशांनी नोंद घ्यावी.
Nov 25, 2013, 09:28 AM ISTठाण्यातील एस X 4 बारवर छापा, बारबालांसह ३१ जणांना अटक
ठाण्यात मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी रात्री बारवर छापा टाकून धांडगधिंगा घालणाऱ्या आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या कारणावरून १८ अल्पवयीन मुलींसह ५६ जणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी बारमध्ये काम करणारे सहा वेटर आणि २५ ग्राहकांना पोलिसांनी अटक केली.
Nov 21, 2013, 11:48 PM ISTठाण्यात पुन्हा कोसळली इमारत, जीवितहानी टळली
ठाण्यातील कळवा भागात आज रात्री पुन्हा एक इमारत कोसळली. पण, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
Nov 18, 2013, 08:00 AM ISTसावधान! घर खरेदी-विक्रीमध्ये फसवणूक
तेलही गेलं.. तुपही गेलं अशीच काहीशी अवस्था ठाण्यातल्या एका व्यावसायिकाची झालीय. तब्बल ७० लाखांचं त्याचं घर बनावट कागदी नोटांमध्ये विकलं गेलं.
Nov 5, 2013, 11:48 AM ISTठाण्यात दिवाळीतली संगीतमय सांस्कृतिक मेजवानी
राज्यात ठिकठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. दिवाळीतली ही संगीतमय सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला नागरिक उत्सुक असतात. ठाण्यातही गडकरी रंगायतनमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम पार पडला.
Nov 2, 2013, 10:16 AM ISTआदिवासी मोखाड्यात बांधणार हॉस्पिटल, उद्धव ठाकरेंची घोषणा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा परिसराचा दौरा केलाय. या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेतर्फे मोखाडा तालुक्यात सुरु असलेल्या कुपोषित बालक आणि गरोदर मातांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा आढावा घेतला. शिवाय कुपोषित बालकं त्याच्या मातांना मिठाई,साडी चोळी वाटपही केली.
Oct 27, 2013, 09:18 AM ISTअनोखा आकाश कंदील, जो चक्क बोलतो!
चिल्ड्रेन टेक सेंटर ठाणे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेनं विकसित केलाय एक अनोखा आकाश कंदील. जो चक्क बोलतो. विशेष म्हणजे सौर उर्जेवर चालत असल्यामुळे तो विजेचीही बचत करतो.
Oct 25, 2013, 02:07 PM ISTठाणे- दिवा दरम्यान महिनाभर मेगाब्लॉग, दोन मार्गांचे काम
मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा जंक्शन दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसातून दोन वेळा मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल आजपासून सकाळी आणि दुपारी बंद असणार आहे.
Oct 23, 2013, 03:02 PM ISTठाण्यात शिवाजी महाराजांची ओळख होण्यासाठी `शिवगौरव` महोत्सव
फेसबुक ट्विटरवर रमणा-या सध्याच्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राशी ओळख व्हावी, त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी ठाण्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जीवनगौरव या संस्थेनं शिवगौरव महोत्सवाचं आयोजन केले आहे.
Oct 23, 2013, 01:10 PM ISTअरे देवा...काय हा शिक्षिकेचा प्रताप, विदयार्थींनीना काय हे करायला लावले?
ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय आहे. पालघर तालुक्यातल्या बोईसर इथल्या एका जिल्हा परिषद शिक्षिका आणि तिच्या पतीनं शाळेतल्या लहान मुलींकडून घरची काम करुन घेण्याची घटना समोर आली आहे. नापास करण्याची धमकी देऊन विदयार्थींनी मूग गिळून काम करीत होत्या.
Oct 22, 2013, 10:52 AM ISTराणे-भुजबळ यांना शिवसेनेत येण्याचे आठवलेंचे निमंत्रण
शिवसेनचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यामुळे आपल्याला शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याची वेळ आली, असे ज्या नेत्यांना वाटते अशा नेत्यांनी आता पुन्हा शिवसेनेत यावे, असा उपरोधिक टोला आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी लगावला आहे.
Oct 17, 2013, 01:37 PM ISTसिनेमातील रियल लाइफ स्टोरी, २५ वर्षानंतर माय-लेकांची भेट
सात वर्षाचा मुलगा अचानक एके दिवशी घराबाहेर पडतो आणि कुटुंबीयांपासून दुरावतो. त्यानंतर सुरु होतो त्याचा संघर्ष आणि कुटुंबीयांच्या भावनांचा खेळ. मात्र २५ वर्षानंतर नियतीचा मनात काही औरच असतं आणि रक्ताच्या नात्यांची पुन्हा एकदा गळाभेट होते.
Oct 17, 2013, 12:03 PM IST