‘शर्मा 280607’… ठाण्याच्या तरुणाचं नाव लघुग्रहावर!
ठाण्यातल्या अमर शर्मा या युवा खगोल शास्त्रज्ञाचं नावं अंतराळातल्या लघुग्रहाला देण्यात आलंय.
May 3, 2014, 10:54 PM ISTसत्ता शिवसेनेची, तिजोरीच्या चाव्या चक्क मनसेकडे
लोकसभा निवडणुकीत एकमेकासमोर उभ्या ठाकलेल्या शिवसेना-भाजप,मनसे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या ठाणे महापालिकेतील दिग्गजांनी सत्तेसाठी पुन्हा एकदा अजब साटेलोटे केलं. ठाणे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या चक्क मनसेच्या हवाली केल्याने ठाणेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
Apr 26, 2014, 10:55 AM ISTठाण्यात महिला निवडणूक अधिकाऱ्याचा मृत्यू
ठाण्यात खोपटच्या मतदान केंद्रावर एका निवडणूक अधिकारी महिलेचा मृत्यू झालाय. वैशाली भावे असं या ३५ वर्षीय महिलेचं नावं असून त्या न्यू बॉम्बे सिटी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका होत्या.
Apr 24, 2014, 08:56 PM ISTमुंबई, ठाण्यासह, खानदेश, कोकण, मराठवाड्यात आज मतदान
राज्यात 19 जागांसाठी हे मतदान होतंय, खानदेश, कोकण आणि मराठवाड्यासह, मुंबई आणि ठाण्यात आज मतदान होतंय.
Apr 24, 2014, 07:13 AM ISTमतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाण्यात सुट्टी ?
लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सहाव्या आणि राज्यातील तिसऱ्या टप्प्यात उद्या मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात खासगी आस्थापनावरील संस्था, हॉटेल, मॉल यांनी आपल्या कर्माचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर करावी, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.
Apr 23, 2014, 01:39 PM ISTपालघर मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष
ठाणे जिल्ह्यात पालघर मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष लागलंय. यंदा पालघर मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजप आणि हितेंद्र ठाकूर यांनी कंबर कसलीये. बहुजन विकास आघाडीनं विद्यमान खासदार बळीराम जाधव यांना पुन्हा उमेदवारी दिलीये. काँग्रेसनं उमेदवार राजेंद्र गावीत यांचा अर्ज मागे घेत बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिलाय.
Apr 11, 2014, 09:39 PM ISTठाणेकरांचा उमेदवारांना धक्का, स्वीकारणार `नोटा`चा पर्याय
ठाणे मुंबई सीमेवरील कोपरी मुलुंड परिसरातले जवळपास २०,००० नागरिक येत्या लोकसभा निवडणुकीत नोटाचा पर्याय स्वीकारणार आहेत. डंपिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर या भागातल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतला हजारो टन कचरा या भागात टाकला जातो त्यामुळे नागरिक अक्षरशः गुदमरलेत.
Apr 6, 2014, 10:43 PM IST`त्या` कामाला नकार दिल्यानं तिच्यावर अमानुष अत्याचार
अतिशय अमानुष अशी घटना भिवंडीत घडलीय. वेश्याव्यवसाय करण्यास नकार दिल्यानं तरूणीवर अमानुष कृत्य करण्यात आलंय. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केलीय. तर दोघं फरार झालेत.
Mar 23, 2014, 01:54 PM ISTठाण्यात इमारतीला आग, दोघांचा मृत्यू, दोन जखमी
ठाण्यातल्या समतानगरमध्ये सुंदरबन पार्क या इमारतीला भीषण आग लागलीय. इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागलीय. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून इमारतीत काहीजण अडकले आहे.
Mar 16, 2014, 09:07 AM ISTशिवसेनेकडून ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या पुत्राला संधी
ठाण्यात शिवसेनेनं इच्छुकांचे पत्ते कट करत एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्राला श्रीकांत शिंदेला उमेदवारी देत धक्का दिलाय. तर राष्ट्रवादीने गटातटाच्या राजकारणाला पूर्ण विराम देत कथोरे आणि नाईक यांचे मनोमिलन घडवून आणलं होतं.
Mar 8, 2014, 08:54 PM IST`जास्त पैसे मोजणार त्याचाच प्रचार करणार`
`मुंबई की ना दिल्ली वालों की पिंकी है पैसे वालों की...` असं म्हणणारी पिंकी आठवतेय का? ही `पैसेवालों की पिंकी` आठवण्याचं कारण म्हणजे मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचं नुकतंच आलेलं एक वक्तव्य...
Mar 6, 2014, 10:15 PM ISTक्लस्टर डेव्हलपमेंट : श्रेयासाठी ठाण्यात पोस्टरबाजी
ठाणे आणि नवी मुंबईमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटची योजना लागू झाल्या नंतर ठाण्यात राजकीय बॅनरबाजीला सुरुवात झालीये. राज्य सरकारने जरी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून क्लस्टरला मंजुरी दिली असली तरी शहरातील बॅनरबाजीबाबत सर्वसामान्य ठाणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Mar 4, 2014, 09:31 AM ISTठाणे, नवी मुंबईसाठी `क्लस्टर डेव्हलपमेंट` मंजूर
राज्य सरकारने मुंबईतील 2000 सालापर्यंत झोपड्यांना सरकारनं संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे धोकादायक इमारतींचा विकास करणे शक्य होणार आहे. तसेच ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेत क्लस्टर डेव्हलपमेंटलाही मंजुरी मिळाली आहे.
Feb 28, 2014, 11:06 PM ISTठाण्यातले स्कायवॉक प्रेमी युगुलांचे अड्डे
ठाण्याची शान समजला जाणारा सॅटीस प्रोजेक्ट, त्याच्या आजूबाजूचे स्कायवॉक सध्या प्रेमी युगुलांचे अड्डे बनलेत. त्यामुळे ठाणेकर वैतागलेत.
Feb 23, 2014, 10:16 AM IST