‘शर्मा 280607’… ठाण्याच्या तरुणाचं नाव लघुग्रहावर!

ठाण्यातल्या अमर शर्मा या युवा खगोल शास्त्रज्ञाचं नावं अंतराळातल्या लघुग्रहाला देण्यात आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 4, 2014, 11:41 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
ठाण्यातल्या अमर शर्मा या युवा खगोल शास्त्रज्ञाचं नावं अंतराळातल्या लघुग्रहाला देण्यात आलंय.
अमेरिकेतले खगोल अभ्यासक डेव्हिड एच. लेव्ही यांनी मंगळ आणि गुरु यांच्या मार्गातल्या लघुग्रहाला ‘शर्मा 380607’ असं नाव दिलंय. लेवी यांनीच 2004 साली या उपग्रहाचा शोध लावलाय.
मुळचा ठाणेकर असलेला अमरचं सुरुवातीचं शिक्षण ठाण्यातल्या सिंघानिया विद्यालयात आणि नंतर बंगळुरुला झालं. खगोल शास्त्रातल्या अभ्यासात त्यानं आपलं आयुष्य वाहून घेतलंय. खगोल अभ्यासादरम्यान तो डेव्हिड यांच्याशी ऑनलाइन चर्चा करत असे. त्याची या विषयातली गोडी लक्षात घेऊनचं डेव्हिड यांनी लघुग्रहाला अमरचं नाव दिलंय.
`इंटरनॅशनल अस्ट्रॉनॉमिकल युनियन`ने गेल्याच आठवड्यात या नामकरणास मान्यता दिलीय.
‘तब्बल सहा लाख लघु ग्रहांमध्ये माझ्या नावाचा एक लघुग्रह अंतराळ फिरतोय ही निशितच आंदाची बाब’ असल्याचं आनंदनं म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.