खड्डे

उद्धव ठाकरेंची दिलगिरीही ‘खड्ड्यात’!

उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त करुन २४ तासही उलटत नाहीत, तोच खड्डे बुजवणाऱ्या कंत्राटदारांनी ठाकरे यांची दिलगिरीही खड्ड्यात घातलीय.

Jul 31, 2013, 01:31 PM IST

राहुल शेवाळेंचं `राजीनामानाट्य`!

खड्ड्यांची जबाबदारी स्वीकारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धाडून दिला. अर्थात अपेक्षप्रमाणे उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा फेटाळलाय.

Jul 30, 2013, 09:51 PM IST

पुण्यातले खड्डे, भ्रष्टाचाराचे अड्डे!

पुण्यात सध्या बहुतेक सगळ्याच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्डे पडलेले हे रस्ते बनवण्यासाठी महापालिकेने तब्बल १३०० कोटी रुपये खर्च केले आहेत. एवढी मोठी रक्कम खर्च करूनही खड्डे का...

Jul 30, 2013, 05:39 PM IST

मुंबईच्या खड्ड्यांवर उद्धव ठाकरेंची दिलगिरी!

मुंबईतल्या खड्ड्यांमुळे सगळीकडे ओरड होत असताना आता खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलंय. उद्धव ठाकरे यांनी पालिकेतल्या पदाधिकाऱ्यांसह या कामाची पहाणी करत मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय.

Jul 30, 2013, 09:10 AM IST

२०% ठेकेदारांचा निष्काळजीपणा, मनपाची कबुली

रस्त्यांच्या कामांमध्ये 20 टक्के ठेकेदारांनी निष्काळजीपणा दाखविल्याची कबुली मुंबई महापालिका प्रशासनानं दिलीय. या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शनिवारी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सर्व ठेकदार तसंच रस्ते विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली.

Jul 27, 2013, 09:43 PM IST

शिळफाट्याला खड्ड्यांमुळे बंपी राईडचा अनुभव!

कल्याण डोंबिवली मुंब्रा बदलापूर विभागाला नवी मुंबई आणि मुंबईशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणजे शीळफाटा ते महापे रस्ता. पण दरवर्षी या अतिमहत्त्वाच्या रस्त्याची चाळण होते.

Jul 27, 2013, 05:47 PM IST

खड्डे मुंबईतील, चक्क परदेशी यंत्रणा कूचकामी

मुंबईच्या रस्त्यांपुढे महापालिकाच काय तर आता चक्क परदेशी यंत्रणेनंही हात टेकलेत... रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेनं दक्षिण आफ्रिकेहून आणलेली कार्बनकोर प्रणालीही सपशेल अपयशी ठरलीय.

Jul 27, 2013, 12:17 PM IST

पुण्यातील खड्ड्यांचे दोन बळी!

पुण्यातल्या खड्ड्यांमुळे अखेर ज्याची भीती होती, तेच झालंय. पुण्यात खड्यांनी दोघांचा बळी घेतलाय. खड्यांमुळे झालेल्या अपघातात गुरबचनसिंग राजपाल आणि प्रशांत मासळकर यांचा मृत्यू झालाय. तर, राजपाल यांचा मुलगा गंभीर जखमी आहे.

Jul 26, 2013, 08:43 PM IST

`एमएमआरडीए`चे खड्डे पालिका बुजवणार!

मुंबईत मोनो-मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामात मुंबई महानगर प्रदेशिक प्राधिकरणानं (एमएमआरडीए) टंगळमंगळ केलीय. त्यामुळे आता हे काम शेवटी पालिकेनंच हाती घेतलंय.

Jul 25, 2013, 12:41 PM IST

मुंबईतील खड्ड्यांवर खड्डाजंगी, वादात मनसेची उडी

मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून स्थायी समितीत जोरदार खड्डाजंगी झाली. स्थायी समितीने वेळोवेळी सूचना देऊनही पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आणि आताचे ठाण्याचे आयुक्त असीम गुप्ता यांनी खड्डे बुजविण्यात दिरंगाई केली. असा थेट आरोप करण्यात आलाय. तर खड्डे बुजवून बिल वसूल करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. तर मनसेनेने सत्ताधाऱ्यांनाच जबाबदार धरलेय.

Jul 25, 2013, 10:24 AM IST

खड्यांनी घेतला महिलेचा बळी, एक जखमी

वसईतल्या खड्यांनी एका महिलेचा जीव घेतलाय. वसईतल्या एव्हरशाईन परिसरातल्या रस्त्यातल्या खड्यात पडून या महिलेचा मृत्यू झालाय.

Jul 23, 2013, 09:32 AM IST

मुंबईतल्या खड्ड्यांवर शिवसेना-मनसेचा ब्लेमगेम

मुंबईच्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांना मुंबईकर पुरते वैतागलेत. एकही रस्ता असा सापडत नाही, ज्याच्यावर खड्डे नाहीत. महत्त्वाचं म्हणजे या खड्ड्यांबद्दल बातम्या दाखवून, त्याचा पाठपुरावा करुनही काही उपयोग होत नाहीय.

Jul 22, 2013, 08:26 PM IST

वसईकरांचा 'जीव' खड्ड्यात!

वसईत पावसाळ्यात पडलेले खड्डे आता किलर स्पॉट ठरतायत. एव्हरशाईन परिसरातल्या या खड्ड्यांनी आशा ढमढेरे या महिलेचा बळी घेतलाय. दुर्दैवाची बाब म्हणजे माणिकपूर पोलिसांनी मृत महिलेलाच तिच्या मृत्यूसाठी दोषी ठरवलंय...

Jul 22, 2013, 07:11 PM IST

अद्भूत! अॅसिडमुळे शहर गायब होणार?

रूसमधील सामारा शहरात अदभूत घटना घडतायत. चून्याचे दगड आणि ऍसिडने भरलेल्या या शहरात रस्त्याला मोठ्-मोठे खड्डे पडत आहेत. एव्हढे मोठे खड्डे की एक खड्डा आख्या गाडीला गिळून टाकतो.

Apr 10, 2013, 02:10 PM IST

राज ठाकरे कडाडले... खड्डे सारखे सारखे का पडतात?

मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये वारंवार खड्डे का पडतात, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Oct 8, 2012, 03:28 PM IST