www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांना मुंबईकर पुरते वैतागलेत. एकही रस्ता असा सापडत नाही, ज्याच्यावर खड्डे नाहीत. महत्त्वाचं म्हणजे या खड्ड्यांबद्दल बातम्या दाखवून, त्याचा पाठपुरावा करुनही काही उपयोग होत नाहीय. राजकीय नेते फक्त ब्लेमगेममध्ये मग्न आहेत.
महत्त्वाच्या आणि मोक्याच्या एलफिन्स्टनच्या ब्रीजवर रस्त्याची पुरती चाळण झालीय. आम्ही फक्त खड्डे दाखवून थांबलो नाही तर त्याचा पाठपुरावा करत स्थानिक लोकप्रतिनिधींना त्याचा जाबही विचारला. त्यावेळी खड्डे राहिले बाजूला आणि राजकीय नेत्यांचा ब्लेमगेमच सुरू झाला.
स्थायी समितीच्या अध्यक्षांनी हा ब्लेमगेम आणखी पुढे नेलाय. एका राजकीय पक्षाच्या नेत्यानं या रस्त्याच्या कंत्राटदाराला गेल्या वर्षी मारहाण केली होती, म्हणून या रस्त्य़ाच्या कामासाठी कुणी कंत्राटदारा पुढे आलाच नाही, असा दावा त्यांनी केलाय.
आधी मनसेनं शिवसेनेवर खापर फोडलं, मग शिवसेनेनं पुन्हा नाव न घेता मनसेलाच टार्गेट केलं. राजकारण्यांच्या या ब्लेमगेममध्ये पुरती वाट लागलीय ती सामान्य मुंबईकरांची...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.