www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यात सध्या बहुतेक सगळ्याच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्डे पडलेले हे रस्ते बनवण्यासाठी महापालिकेने तब्बल १३०० कोटी रुपये खर्च केले आहेत. एवढी मोठी रक्कम खर्च करूनही खड्डे का... असा प्रश्न आता विचारला जातोय. विशेष म्हणजे खड्ड्यांवरुन सत्ताधारी नगरसेवकांनीच ही टीका केलीय.
पुण्यातल्या कोणत्याही भागात तुम्ही जा... तुमचं स्वागत होईल ते रस्त्यांवरच्या अशा खड्यांनी.... असे खड्डेमय रस्ते तयार करण्यासाठी महापालिकेनं गेल्या पाच वर्षांत १३०० कोटी खर्च केले आहेत... महापालिकेनं गेल्या पाच वर्षांत सामान्य पुणेकरांचा पैसा खड्ड्यांवर उधळला आहे.
२००८ मध्ये रस्त्यांच्या कामासाठी २१२ कोटी खर्च करण्यात आले. २००९ मध्ये हा आकडा २०१ कोटी इतका होता. २०१० मध्ये १७९ कोटी तर तर २०११ मध्ये २८५ कोटी रस्त्यांसाठी खर्च केले. गेल्या वर्षी हा आकडा ३०० कोटींवर जाऊन पोहोचला. तर, २०१३ मध्ये रस्त्यासाठी महापालिकेने ४४९ कोटी रुपयांची तरतूद केलीय. म्हणजेच गेल्या पाच वर्षांत रस्यांवर एकूण १३०० कोटी खर्च करण्यात आले. या व्यतिरिक्त केंद्र सरकारकडून जेएनएनयुआरएम अंतर्गत रस्त्यांसाठी आलेला निधी वेगळाच... मात्र सध्या रस्त्यांवरचे खड्डे पाहता हे १३०० रुपये गेले कुठे, असा सवाल विचारला जातोय.
सत्ताधारीच खड्यांच्या विरोधात बोलतायत, यावरून पुण्यातल्या खड्यांची काय अवस्था असेल, याची कल्पना येऊ शकते... मात्र आता खड्यांसाठी प्रशासनाला जबाबदार धरणारे सत्ताधारी रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च होत असताना आणि निकृष्ट दर्जाचं काम होत असताना, काय करत होते... असा प्रश्न पुणेकरांचा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.