राणेंचा गृहमंत्रालयावर हल्लाबोल

भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील कार्यालवरच्या हल्ल्याप्रकरणी खा. नीलेश राणे यांना नाहक गोवण्यात येतयं, असा आरोप नारायण राणे यांनी केलाय.

Updated: Nov 10, 2011, 05:06 AM IST


झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील कार्यालवरच्या हल्ल्याप्रकरणी खा. नीलेश राणे यांना नाहक गोवण्यात येतयं, असा आरोप नारायण राणे यांनी केलाय. ते म्हणाले, गृहमंत्रालय राणेंना नाहक टार्गेट करत आहे.

 
दरम्यान, भास्कर जाधव यांच्या ऑफिसवर झालेला हल्ला हा अयोग्य असल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांती स्पष्ट केलय. दोषींवर कारवाई होणारच, असंही त्यांनी म्हटलयं.

 

कोकणात नारायण राणे विरुद्ध भास्कर जाधव यांच्यातल्या वादामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हमरीतुमरीवर आले असल्यानं पोलिसांनी सिंधुदुर्गात आंदोलन करण्यास मनाई आदेश काढलायं. सिंधुदुर्गात राणेंना यापुढं जशास तसं उत्तर देऊ, असा आवाज राणेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीनं दिलाय, तर राणे समर्थकांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना नेहमीच्या स्टाईलमध्ये बजावलं आहे

 

चिपळूणात सुरु झालेल्या राणे-जाधव वादाचे पडसाद सिंधुदुर्गात असे उमटले आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेला मालवणी मुलुख पुन्हा अशांत झाला आहे.

 
राष्ट्रवादीनं आवाज देताच राणे समर्थकही उसळलेत. प्रत्युत्तर दिलंत तर नेस्तनाभूत करू असा दमच त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भरला. त्यामुळे चिडलेल्या राष्ट्रवादीनं यापुढे जिल्ह्यात काँग्रेसबरोबर आघाडी करणार नाही, अशी घोषणा करून निवडणुकीच्या रणमैदानातही काँग्रेसला आव्हान दिलयं.