कोकणात प्रचाराचं रणशिंग

रत्नागिरी नगर परिषदेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारालाही शिवसेनेनं रत्नागिरीतून सुरूवात केली आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे चर्चेत आलेल्या नाटेगावातून शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं.

Updated: Jan 4, 2012, 02:32 PM IST

www.24taas.com, रत्नागिरी

रत्नागिरी नगर परिषदेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारालाही शिवसेनेनं रत्नागिरीतून सुरूवात केली आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे चर्चेत आलेल्या नाटेगावातून शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं.

नगरपरिषद निवडणुकांमध्ये कोकणात नारायण राणेंना यश प्राप्त झालं नाही. उलट काँग्रेस आघाडीकडील रत्नागिरी नगरपरिषद एकहाती शिवसेना भाजपकडं आली. याच वातावरणाचा फायदा घेत शिवसेनेनं जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा मंगळवारी मुहूर्त साधला. जैतापूर प्रकल्पाला शिनसेनेचा विरोध असल्यानं येथील जनतेच्या प्रश्नाला हात घालत शिवसेना नेते रामदास कदम यांनी नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार टीका करत प्रचाराचा धुरळा उडवून दिला.

दरम्यान,  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूका पार पडल्यानंतर जैतापूर प्रकल्पाच्या प्रश्नावरून संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरवणार असून याचं नेतृत्व स्वत: करणार असल्याचं शिवसेना नेते रामदास कदम यांनी यावेळी जाहीर केलं. आगामी निवडणुकांमध्ये नारायण राणे यांच्याबरोबरच जैतापूर प्रकल्प हा शिवसेनेच्या प्रमुख मुद्दे ठरणार असून आता काँग्रेस किंवा नारायण राणे शिवसेनेविरूद्ध प्रचाराचे कोणते अस्त्र वापरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

[jwplayer mediaid="23384"]