कापूस

कापसाचे भाव पुन्हा वाढणार?

कापसाचे भाव प्रति क्विंटल २०० ते ३०० रूपये घसरल्यानंतर, पुन्हा कापसाच्या भावात तेजी येण्यास सुरूवात झाली आहे. भारताकडे काही देशांकडून कापसाची वाढती मागणी आणि दिवसेंदिवस कापूस उत्पादनात घट झाल्याचा आकडा वाढत असल्याने, कापसाचे भाव आठवड्याच्या आत पुन्हा ५ हजारावर जाण्याची चिन्हं आहेत.

Jan 21, 2016, 10:38 AM IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला मदत मात्र, कापूस शेतकरी वंचित

सरकारने दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर केली खरी मात्र, यातही मोठा घोळ केल्याचं समोर आलंय. राज्य सरकारनं दुष्काळग्रस्तांना मदतीचा जीआरच काढला. मात्र यातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांव्यतिरिक्त मदत करण्यात यावी, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. 

Jan 1, 2016, 11:27 PM IST

कापसाची भाव वाढण्याची कारणं

(जयवंत पाटील, झी २४ तास) राज्यात फार कमी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असताना, कापसाच्या भावात वाढ झाली आहे. पणन आणि सीसीआयकडून ४१०० रूपये प्रतिक्विंटलने कापूस खरेदी होत होता. मात्र खासगी व्यापाऱ्यांनी प्रतिक्विंटल ४८०० पर्यंत भाव देणे सुरू केल्याने शेतकऱ्यांनी, पणन आणि सीसीआयकडे पाठ फिरवली आहे. 

Dec 28, 2015, 11:31 PM IST

गुजरातमध्ये कापसाला प्रति क्विंटल ५५० बोनस

गुजरात सरकारने कापसाला प्रति क्विंटल ५५० रूपये बोनस जाहीर केला आहे. तेव्हा महाराष्ट्र सरकार कापसाला बोनस कधी जाहीर करणार असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

Dec 20, 2015, 08:03 PM IST

कापूस उत्पादकांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी

पाकिस्तान भारताकडून १० लाख कापसाच्या गाठी घेणार आहे. कापसाची एक गाठ १७० किलो वजनाची असते. पाकिस्तानात पुरामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं आहे, यामुळे पाकिस्तानला कापसाची गरज आहे. पाकिस्तानने मागील वर्षी देखील भारताकडून ५ लाख कापसाच्या गाठ्या आयात केल्या होत्या.

Dec 2, 2015, 12:21 AM IST

राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत

खानदेशातला कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी दुष्टचक्रात सापडला आहे. एकीकडे सरकारी कापूस खरेदी केंद्रांवर कवडी मोल भावात कापूस खरेदी केला जात असल्याने तो विकायला परवडत नाही तर दुसरीकडे कापूस खरेदी बेभरवशाची झाल्याने, शेतकऱ्यांना कापूस घरात भरून ठेवल्याशिवाय पर्याय नाही. कापसाला किमान सहा हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. 

Dec 2, 2015, 12:10 AM IST

कापूस उत्पादक शेतकऱ्यावर दुहेरी संकट

कापूस उत्पादक शेतकऱ्यावर दुहेरी संकट

Dec 1, 2015, 08:39 PM IST

कापूस उत्पादकांच्या पदरी निराशाच

कापूस उत्पादकांच्या पदरी निराशाच

Nov 20, 2015, 09:10 PM IST

ठिबक सिंचन, कापूस उत्पादकांना खडसेंचा दिलासा

कापूस उत्पादक आणि ठिबक सिंचनाच्या अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Jun 10, 2015, 11:54 AM IST

एरंडोल येथील कापसाच्या व्यापार्‍याचा खून

येथील मोठा माळीवाडा परिसरात असणार्‍या पाटचारीच्या पाण्यात आज सकाळी गोणपाटात एक मृतदेह तरंगत आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा मृतदेह एरंडोल येथील कपाशी व्यापार्‍याचा असल्याचे उघड झाले आहे. 

Feb 2, 2015, 05:12 PM IST

जालन्यातील कापूस, मका, सोयाबीन उत्पादन अडचणीत

जालन्यातील कापूस, मका, सोयाबीन उत्पादन अडचणीत

Dec 3, 2014, 09:01 PM IST