मुळ्याच्या पानांना कचरा समजण्याची चूक करू नका; जाणून घ्या त्याचे 'हे' 6 फायदे

Radish leaves: आपल्यापैकी बरेच जण मुळा वापरतात पण मुळ्यांची पाने कचरा  समजून टाकुन देतात मात्र , मुळ्याच्या पानांमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्याचे आयुर्वेद आणि पोषण तज्ज्ञ (Nutrition) सांगतात.

Updated: Dec 18, 2024, 05:13 PM IST
मुळ्याच्या पानांना कचरा समजण्याची चूक करू नका; जाणून घ्या त्याचे 'हे' 6 फायदे title=

Benefits of Radish leaves: आपण मुळ्याची भाजी रोजच्या खाद्यपदार्थात वापरतो. कित्याक लोकं मुळ्यांची पाने कचरा समजून टाकुन देतात. याच्या पानांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी मोठी चूक ठरू शकते. मुळ्याच्या पानांमध्ये भरपूर पोषक तत्वे तर असतातच, याशिवाय अनेक रोगांशी लढण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासही ते उपयुक्त ठरतात. मुळाच्या पानांमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म दडलेले असल्याचे न्यूट्रिशन एक्सपर्ट सांगतात. न्यूट्रिशन एक्सपर्ट नेहमी रोगप्रतीकारक शक्ति वाढवण्यासाठी मुळ्यांची पाने आहारात घेण्याचा सल्ला देतात. या पानांमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्याचे 'आयुर्वेदात' सुध्दा आढळते.

1. इम्युनिटी बूस्टर

मुळ्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. हे शरिराला संसर्गापासून वाचवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. हेच करण आहे की मुळ्याच्या पानांना 'इम्युनिटी बूस्टर' (Immunity Booster) सुध्दा म्हणतात.
 

2. पचनसंस्थेसाठी फायदेशीर

मुळ्याच्या पानांमध्ये भरपूर फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. बद्धकोष्ठता (Constipation), गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी हे गुणकारी आहे. मुळ्याच्या पानांचे नियमित सेवन केल्याने पोट साफ राहते.

3. मधुमेहामध्ये फायदेशीर

मुळ्याच्या पानांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामध्ये ग्लुकोसिनोलेट्स आणि आयसोथिओसायनेट्स सारखी संयुगे आढळतात, जी इन्सुलिनच्या पातळीत संतुलन राखतात. त्यामुळेच ही पाने मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरते.

4. वजन कमी करण्यात उपयुक्त

कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे वजन कमी करण्यासाठी मुळ्याची पाने उत्तम पर्याय आहेत. हे भूक नियंत्रित करते आणि तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. बऱ्याच सेलिब्रिटी त्यांच्या डायट (Diet) प्लॅनमध्ये ही पाने आवर्जुन जोडतात.

5. हाडांना बनवते मजबूत

मुळ्याच्या पानांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते. जो हाडांना मजबूत बनवतात. यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्या दूर राहण्यास मदत होते.

6. रक्त शुध्द करण्यास उपयुक्त

मुळ्याच्या पानांमध्ये काही कमी प्रभावाचे विषारी गुणधर्म असतात, जे शरीरातील घाण काढून टाकण्यास मदत करते. यामुळे रक्त शुद्ध होते आणि त्वचा बरीच उजळते.

7. कसा करावा मुळ्याच्या पानांचा वापर-

   * मुळ्याच्या पानांपासून भाजी किंवा पराठे बनवा.
   * ते सूपमध्ये घालून खा.
   * पानांचा रस तयार करून प्या.
   * त्यांचा सॅलडमध्ये समावेश करा.

हे ही वाचाः Curd In Winter: हिवाळ्यात दही खाणं कितपत योग्य? काय आहे तज्ज्ञांचे मत?

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)