कापसाची भाव वाढण्याची कारणं

(जयवंत पाटील, झी २४ तास) राज्यात फार कमी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असताना, कापसाच्या भावात वाढ झाली आहे. पणन आणि सीसीआयकडून ४१०० रूपये प्रतिक्विंटलने कापूस खरेदी होत होता. मात्र खासगी व्यापाऱ्यांनी प्रतिक्विंटल ४८०० पर्यंत भाव देणे सुरू केल्याने शेतकऱ्यांनी, पणन आणि सीसीआयकडे पाठ फिरवली आहे. 

Updated: Dec 28, 2015, 11:31 PM IST
कापसाची भाव वाढण्याची कारणं title=

मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास) राज्यात फार कमी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असताना, कापसाच्या भावात वाढ झाली आहे. पणन आणि सीसीआयकडून ४१०० रूपये प्रतिक्विंटलने कापूस खरेदी होत होता. मात्र खासगी व्यापाऱ्यांनी प्रतिक्विंटल ४८०० पर्यंत भाव देणे सुरू केल्याने शेतकऱ्यांनी, पणन आणि सीसीआयकडे पाठ फिरवली आहे. 

पाहुयात काय आहेत भाव वाढण्याची कारणं
१) पाकिस्तानात पूरस्थिती, कापसाचं मोठं नुकसान, अचानक १० लाख गाठींची मागणी
२) बांगलादेशकडूनही २० लाख गाठींच्या पुढे मागणी
३) व्हियतनामलाही मोठ्या प्रमाणात कापसाची गरज, यापूर्वी २५ लाख गाठींची मागणी बोलून दाखवली.
४) पंजाब आणि हरियाणात पांढऱ्या माशीचा कापूस पिकावर प्रार्दुभाव, नंतरचा कापूस आलाच नाही.
५) महाराष्ट्रासह दक्षिणेतील कर्नाटक, आंध्र, तेलंगाणात दुष्काळाची परिस्थिती असल्याने उत्पन्न घटले.
६) सीसीआय आणि काही रिसर्च एजन्सीजकडून देशांतर्गत ११ टक्के उत्पादन घटल्याचा अंदाज
७) अंतर्गत उद्योगांसाठी कापसाची मोठी गरज, भाव वाढल्याने आणखी मागणी वाढली.
८) गुजरातमध्ये शेतकऱ्यांचं मन राखण्यासाठी प्रति क्विंटल ५५० रूपये बोनस जाहीर झाल्याने मार्केट आणखी कडाडले.

यापूर्वी कापसाचा भाव कमी राहण्याची कारणे
१) सर्वात जास्त कापसाची मागणी करणाऱ्या चीनने यंदा पाठ फिरवली.
२) कापसाचं विक्रमी उत्पादन होणार असे अंदाज रंगवले गेले.
३) दुष्काळ आणि रोगाच्या प्रादुर्भावाची सत्य परिस्थिती सरकार दरबारी मांडली गेली नाही.
४) कापसाची मागणी बांगलादेश आणि पाकिस्तानकडून डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला झाली. यानंतर भाव वाढ झाली.
५) अमेरिका, ब्राझिल, चीनसारख्या प्रमुख उत्पादकांकडे कापसाचे मोठे उत्पन्न असल्याने जागतिक बाजारपेठेत भाव कमी