राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत

खानदेशातला कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी दुष्टचक्रात सापडला आहे. एकीकडे सरकारी कापूस खरेदी केंद्रांवर कवडी मोल भावात कापूस खरेदी केला जात असल्याने तो विकायला परवडत नाही तर दुसरीकडे कापूस खरेदी बेभरवशाची झाल्याने, शेतकऱ्यांना कापूस घरात भरून ठेवल्याशिवाय पर्याय नाही. कापसाला किमान सहा हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. 

Updated: Dec 2, 2015, 12:10 AM IST
राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत title=

धुळे : खानदेशातला कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी दुष्टचक्रात सापडला आहे. एकीकडे सरकारी कापूस खरेदी केंद्रांवर कवडी मोल भावात कापूस खरेदी केला जात असल्याने तो विकायला परवडत नाही तर दुसरीकडे कापूस खरेदी बेभरवशाची झाल्याने, शेतकऱ्यांना कापूस घरात भरून ठेवल्याशिवाय पर्याय नाही. कापसाला किमान सहा हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. 

धुळे : जिल्ह्यातल्या गरताड गावातले हे आहेत दिलीप पाटील... बारा एकरवर त्यांनी कापसाची लागवड केली होती...पाऊस चांगला पडेल आणि कापसाचं उत्पन्न चांगलं होईल अशी अपेक्षा पाटील यांना होती...पण पावसानं पाठ दाखवली आणि आता कापसाचे दर कापूस उत्पादकांचं कंबरडं मोडायला निघालेत. खान्देशात तब्बल १५ लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. 

सरकारनं कापूस खरेदी केंद्र सुरू केलीयत. पण त्याठिकाणी ३९०० ते ४१५० पर्यंतच भाव मिळतोय. या भावात कापूस विकायला परवडत नाही. खेडा खरेदीदार व्यापारी पड्या भावात शेतकऱ्यांकडून कापूस मागतायत. काही व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूकही करतायत.

कापसाची अर्थ व्यवस्था कोलमडली असल्याचे लक्षात घेता, आता तर खेडा खरेदी देखील मोजक्याच ठिकाणी सुरु आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला कापूस घरात भरून ठेवल्याशिवाय पर्याय नाही. 

घरात पडलेला कापूस, त्यामुळे झालेली आर्थिक कोंडी अशा अडचणीत काय मार्ग काढावा, हेच खान्देशातल्या कापूस उत्पादकाला कळत नाहीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.