अहमदाबाद : कापसाचे भाव प्रति क्विंटल २०० ते ३०० रूपये घसरल्यानंतर, पुन्हा कापसाच्या भावात तेजी येण्यास सुरूवात झाली आहे. भारताकडे काही देशांकडून कापसाची वाढती मागणी आणि दिवसेंदिवस कापूस उत्पादनात घट झाल्याचा आकडा वाढत असल्याने, कापसाचे भाव आठवड्याच्या आत पुन्हा ५ हजारावर जाण्याची चिन्हं आहेत.
गुजरात आणि महाराष्ट्रात यावेळस कापसाचं उत्पन्न ३० टक्के घटलं असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र सीसीआय सारख्या संस्था याला अजूनही दुजोरा देतांना दिसत नसल्याने, खरी परिस्थिती डोळे पांढरी करणारी आहे.
महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकमध्ये कमी पाऊस, पंजाब, हरियाणात बनावट किटक नाशकांचा वापर यामुळे मोठ्या प्रमाणात कापूस उत्पन्न घटलं आहे. गुजरातमध्येही ११ टक्के कापसाच्या उत्पादनात घट आली आहे. यामुळे तुटवडा वाढल्याचं भीषण वास्तव दिवसेंदिवस समोर येत असल्याने कापसाची भाववाढ अटळ आहे.