ठिबक सिंचन, कापूस उत्पादकांना खडसेंचा दिलासा

कापूस उत्पादक आणि ठिबक सिंचनाच्या अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Updated: Jun 10, 2015, 11:55 AM IST
ठिबक सिंचन, कापूस उत्पादकांना खडसेंचा दिलासा title=

मुंबई : कापूस उत्पादक आणि ठिबक सिंचनाच्या अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

कापसाच्या (बीटी कॉटन) बियाण्याच्या पाकिटामागे शंभर रूपये कमी करण्याची सूचना सरकारने दिली आहे, तर मागील तीन वर्षापासून ठिबक सिंचनाच्या अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना थकबाकी मिळणार आहे.

ठिबक सिंचनाचे मागील तीन वर्षांचे ३३१ कोटी रूपयांचे शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. त्यापैकी २३१ रूपयांचे तात्काळ वितरण करणार असल्याचं राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच ठिबक सिंचनाचे अर्ज स्वीकारणे बंद होते. ते देखिल स्वीकारणे सुरू करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

बीटी कॉटनच्या बियाणांची किंमत कमी होणार आहे, यासाठी कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी कंपन्यांना नोटीस बजावली आहे, प्रत्येक थैलीमागे १०० रुपये दर कमी होणार आहे, तसेच दर कमी न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार आहे.

तसेच बोगस बियाण्यांबाबत तक्रार करता येणार आहे, 1800 233 4000 या टोल फ्री क्रमांकावर कारवाई करता येणार आहे. बियाणे नियंत्रणे आदेशाअंतर्गत आणि जीवनावश्यक वस्तु कायद्याअंतर्गत ही कारवाई होणार आहे.

तसेच बोगस बियाणे विकणाऱ्यांवर बियाणे विक्री बंदी, विक्री परवाना रद्द, 420 चा गुन्हा, बियाणे जप्ती, गोदाम जप्त अशी कारवाई देखिल होणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.