Teenage Mothers Increasing: ग्रामीण महाराष्ट्रात अल्पवयीन मातांची संख्या चिंताजनक पद्धतीनं वाढत चाललीय. सातारा जिल्ह्यासारख्या प्रगत जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात सरकारी हॉस्पिटलमध्ये तब्बल 43 अल्पवयीन मातांची प्रसुती झालीय. नोंद न झालेल्या अल्पवयीन मातांची संख्या मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा करुनही अल्पवयीन मुलींची लग्न आणि अल्पवयीन मातांची संख्या कमी होत नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
अल्पवयीन मुलींचं लग्न करणं हा गुन्हा असतानाही ग्रामीण महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींची सर्रास लग्न होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय. एकट्या सातारा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत 43 अल्पवयीन मातांची प्रसुती झाल्याची आकडेवारी समोर आलीय. अल्पवयीन मातांच्या प्रसुतीचा हा सरकारी आकडा असून खरी आकडेवारी यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान वयातल्या गर्भधारणेमुळं मातेच्या जीवाला धोका असल्याचं तज्ज्ञ सांगतात..
बालविवाह रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात. सातारा जिल्ह्यात सुरु असलेल्या वर्षात 29 बालविवाह रोखण्यात आले. पण तरीही अल्पवयीन विवाहित मातांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. कायदा माहिती असूनही वधू-वराकडील मंडळी गुपचूप लग्न उरकत असल्याचं सांगण्यात येतंय. सातारा हा शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेला जिल्हा आहे. सातारासारख्या जिल्ह्यात अल्पवयीन मातांची संख्या मोठी असेल तर शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास जिल्ह्यांत अल्पवयीन मातांची संख्य़ा किती असेल याचा विचार न केलेला बरा.
छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ फडणवीस सरकारनी मोठी घोषणा केलीये. शिवनेरी किल्यावर सर्वात मोठा स्वराज्यध्वज लावला जाणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास आता शिक्षेची तरतूद करण्यात आली असून एक लाख आणि तुरुंगवासाची शिक्षा असणार असल्याचं विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
परभणी घटनेवरून विरोधक आक्रमक झालेत. आरोपींवर कारवाई करण्यासाठी विरोधकांनी विधानभवनाच्या पाय-यावर आंदोलन केलं. त्यानंतर विधानसभेतही गोंधळ झाला. विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. बीड, परभणी घटनेवरून सरकार गंभीर नाही, असा आरोप करत विरोधकांचा सभात्याग केलाय.