गुजरातमध्ये कापसाला प्रति क्विंटल ५५० बोनस

गुजरात सरकारने कापसाला प्रति क्विंटल ५५० रूपये बोनस जाहीर केला आहे. तेव्हा महाराष्ट्र सरकार कापसाला बोनस कधी जाहीर करणार असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

Updated: Dec 20, 2015, 08:03 PM IST
गुजरातमध्ये कापसाला प्रति क्विंटल ५५० बोनस title=

अहमदाबाद : गुजरात सरकारने कापसाला प्रति क्विंटल ५५० रूपये बोनस जाहीर केला आहे. तेव्हा महाराष्ट्र सरकार कापसाला बोनस कधी जाहीर करणार असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

राज्यात सध्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच सीसीआय आणि पणन महामंडळाकडून प्रति क्विंटल ४१०० रूपये भावाने कापूस खरेदी सुरू आहे. मात्र गुजरातमध्ये या भावानंतरही प्रति क्विंटल ५५० रूपये बोनस जाहीर करण्यात आला आहे.

तेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आशा देखील बोनससाठी पल्लवित झाल्या आहेत. निदान सततचा दुष्काळ म्हणून सरकार विचार करेल आणि बोनस जाहीर करेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात सध्या भाजपचेच सरकार असल्याने महाराष्ट्रातही बोनस जाहीर होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.