नवी दिल्ली : पाकिस्तान भारताकडून १० लाख कापसाच्या गाठी घेणार आहे. कापसाची एक गाठ १७० किलो वजनाची असते. पाकिस्तानात पुरामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं आहे, यामुळे पाकिस्तानला कापसाची गरज आहे. पाकिस्तानने मागील वर्षी देखील भारताकडून ५ लाख कापसाच्या गाठ्या आयात केल्या होत्या.
पाकिस्तानने १० लाख गाठी भारतातून आयात करण्याची तयारी दर्शवल्याने कापूस उत्पादकांसाठी ही दिलासादायक बाब असू शकते, मात्र महत्वाचा खरेदीदार चीनने या वर्षी भारतीय कापसाकडे तोंड फिरवल्याने, कापसाचे भाव अजूनही स्थिर आहेत.
दुसरीकडे बांगलादेश आणि इंडोनेशियाने देखील भारताकडून कापूस खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र अद्याप त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही. पाकिस्तानने भारताकडून १० लाख कापसाच्या गाठी आयात करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.