कांग्रेस

काँग्रेसने हार्दिक पटेलला दिली 'ही' ऑफर, मिळालं असं उत्तर...

आगामी काळात गुजरात विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे लक्षात घेऊन पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेल याला काँग्रेसकडून निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आली.

Oct 21, 2017, 10:01 PM IST

जेव्हा स्मृती इराणी आणि प्रियांका गांधी येतात आमनेसामने

केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी प्रियांका गांधी यांच्यासोबतच्या एका भेटीचा किस्सा सांगितला आहे. जो सध्या भलताच चर्चेत आहे. २०१४मध्ये प्रियांका गांधी यांची आणि आपली भेट विमानात झाल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.

Oct 10, 2017, 04:16 PM IST

राहुल गांधींच्या अमेठी दैऱ्याला प्रशासनाने परवानगी नाकारली

पारंपरीक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेठीमध्ये कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना प्रशासनाने प्रवेश नाकारला आहे. सध्या सण आणि उत्सवाचा काळ आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत प्रशासनाने हा प्रवेश नाकारला आहे.

Oct 1, 2017, 07:31 PM IST

राहुल गांधी सभेत म्हणाले ‘केम छो’, लोक म्हणाले ‘गाडो थई छो’

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या गुजरात दौ-यावर असून या दौ-याच्या तिस-या दिवशी घेतलेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

Sep 26, 2017, 02:25 PM IST

दाऊदची पत्नी मुंबईत आली पण, मोदी सरकारला खबरच नाही - कॉंग्रेस

कुख्यात दाऊद इब्राहिम याची पत्नी महजबी शेख मुंबईत येऊ आपल्या वडिलांना भेटून गेली पण मोदी सरकारला याची खबरच लागली नाही. कारण, सरकार झोपले होते, असा आरोप कॉंग्रेसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केला आहे. 

Sep 24, 2017, 09:48 AM IST

युवा काँग्रेसच्या रॅलीत पत्रकार महिलेची छेडछाड !

जंतर मंतरवर आयोजित केलेल्या युवा काँग्रेस रॅलीच्या वेळेस काही अज्ञात लोकांनी छेडछाड केल्याचा आरोप गुरुवारी रात्री एका पत्रकार महिलेने केला. तिने दिल्ली पोलिसांकडे तशी तक्रार देखील दाखल केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की, पत्रकार महिलेले अशी तक्रार केली असून आम्ही याविरुद्ध छेडछाडीची तक्रार नोंदवली आहे आणि त्यासंदर्भात तपास देखील चालू आहे. तक्रार करण्याऱ्या महिलेने कोणाचे नाव सांगितले नाही. 

Aug 11, 2017, 10:27 AM IST

लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज - सोनिया गांधी

काँग्रेसवर अनेक आरोप झाले आहेत आणि होत आहेत. संकटे आली मात्र तरीही पक्षाने अनेक संकटे पचवली आहेत. आम्ही आगामी लोकसभा निवडणुकांच्या लढाईसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. तालकटोरा स्टेडियमवर काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनात त्या बोलत होत्या.

Jan 17, 2014, 12:52 PM IST

एन.डी. तिवारींची ‘ग्रँडमस्ती’, महिलेसह डान्स जबरदस्ती

वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर पोहचलेले वयोवृद्ध नेते नारायण दत्त तिवारी आजकाल आपल्या विचित्र वागणुकीमुळे चर्चेत आहे. रविवारी लखनऊमध्ये शहीदांसाठी उदय भारत संस्थेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते.

Sep 23, 2013, 05:25 PM IST

काँग्रेस विरोधात करणार देशव्यापी आंदोलन- रामदेवबाबा

योगगुरू रामदेवबाबा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस सरकारविरोधात रणशिंग फुंकलंय. येत्या १३ सप्टेंबरपासून त्यांनी देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केलीय. काँग्रेस सरकार भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यात आणि काळा पैसा परत आणण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत रामदेवबाबांनी ही घोषणा केली.

Sep 9, 2013, 04:24 PM IST

सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

कर्नाटकातील मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेली रस्सीखेच आज सायंकाळी संपली. काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी के. सिद्धरामय्या यांच्या नावावर सहमती झाली आहे.

May 10, 2013, 05:52 PM IST