नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी प्रियांका गांधी यांच्यासोबतच्या एका भेटीचा किस्सा सांगितला आहे. जो सध्या भलताच चर्चेत आहे. २०१४मध्ये प्रियांका गांधी यांची आणि आपली भेट विमानात झाल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.
टाईम्स नाऊ या वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत स्मृती इराणी यांनी हा किस्सा सांगितला आहे. वास्तवात स्मृती इराणी या नेहमीच प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधत असतात. पण, त्यांच्या या मुलाखतीतून त्यांनी प्रियांका यांच्या व्यक्तिमत्वातील एक वेगळाच पैलू दाखवला आहे. मुलाखतीदरम्यानस स्मृती इराणी म्हणतात, २०१४ मध्ये मी जेट एअरवेजच्या विमानाने प्रवास करत होते. योगायोग असा की, प्रियांकाही त्याच विमानाने प्रवास करत होत्या. आम्ही चेन्नईला निघालो होतो.
विमानातील प्रवासादरम्यान, माझ्या सीटच्या पाठिमागेच त्यांची सीट होती. मी पाठीमागे वळून माझा परिचय दिला मी स्मृती ईराणी. त्यावेळी प्रियांका गांधी यांची प्रतिक्रीया अत्यंत साधी आणि विनम्र होती, असे ईराणी यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ईराणी म्हणाल्या देशात एक पक्ष नेहमी सत्तेता राहिला आहे ज्याची ओळख तुम्हाला माहिती आहे माझे वडील कोण आहे? अशी वृत्ती ठेवतो. अशा पक्षासमोर आमचे कर्तव्य ठरते की आम्ही विनम्र राहिले पाहीजे. एक भाजप कार्यकर्त्याच्या नात्याने आमचे कर्तव्य आहे की, समोरच्या व्यक्तिसोबत अत्यंत विनम्र होऊन संवाद साधने.
दरम्यान, २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी अमेठीमध्ये प्रियांका गांधी आपले बंधू राहुल गांधी यांचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरल्या होत्या. तेव्हा त्यांना स्मृती ईराणी यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा, प्रियांका यांनी कोण स्मृती इराणी असा सवाल केला होता. दरम्यान, जेव्हा आपण समोरासमोर भेटलो तेव्हा आपण आपला परिचय दिला, असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.