काँग्रेस विरोधात करणार देशव्यापी आंदोलन- रामदेवबाबा

योगगुरू रामदेवबाबा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस सरकारविरोधात रणशिंग फुंकलंय. येत्या १३ सप्टेंबरपासून त्यांनी देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केलीय. काँग्रेस सरकार भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यात आणि काळा पैसा परत आणण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत रामदेवबाबांनी ही घोषणा केली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 9, 2013, 04:24 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
योगगुरू रामदेवबाबा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस सरकारविरोधात रणशिंग फुंकलंय. येत्या १३ सप्टेंबरपासून त्यांनी देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केलीय. काँग्रेस सरकार भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यात आणि काळा पैसा परत आणण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत रामदेवबाबांनी ही घोषणा केली.
दिल्लीतील जंतरमंतरवर ‘व्यवस्था परिवर्तन रॅली’ला संबोधित करतांना रामदेवबाबांनी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि सोनिया गांधीवर टीका केली. काँग्रेसचे नेते स्विस बँकेत असलेला पैसा परत आणण्यास काही प्रयत्न करत नाहीय. “पंतप्रधानांना देशाच्या संविधानानुसार काम करायला हवं, न की १० जनपथच्या सुचनांनुसार” असा टोला ही त्यांनी पंतप्रधानांना लगावला.
पंतप्रधानांवर टीका करतांना दुसरीकडे रामदेवबाबांनी नरेंद्र मोदींची स्तुती केली. भाजपनं लवकरात लवकर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदींच्या नावाची घोषणा करावी, असं रामदेवबाबा म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.