युवा काँग्रेसच्या रॅलीत पत्रकार महिलेची छेडछाड !

जंतर मंतरवर आयोजित केलेल्या युवा काँग्रेस रॅलीच्या वेळेस काही अज्ञात लोकांनी छेडछाड केल्याचा आरोप गुरुवारी रात्री एका पत्रकार महिलेने केला. तिने दिल्ली पोलिसांकडे तशी तक्रार देखील दाखल केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की, पत्रकार महिलेले अशी तक्रार केली असून आम्ही याविरुद्ध छेडछाडीची तक्रार नोंदवली आहे आणि त्यासंदर्भात तपास देखील चालू आहे. तक्रार करण्याऱ्या महिलेने कोणाचे नाव सांगितले नाही. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 11, 2017, 10:31 AM IST
युवा काँग्रेसच्या रॅलीत पत्रकार महिलेची छेडछाड ! title=
पत्रकार महिलेने ट्विटरच्या माध्यमातून झालेला प्रसंग सांगितला.

नवी दिल्ली: जंतर मंतरवर आयोजित केलेल्या युवा काँग्रेस रॅलीच्या वेळेस काही अज्ञात लोकांनी छेडछाड केल्याचा आरोप गुरुवारी रात्री एका पत्रकार महिलेने केला. तिने दिल्ली पोलिसांकडे तशी तक्रार देखील दाखल केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की, पत्रकार महिलेले अशी तक्रार केली असून आम्ही याविरुद्ध छेडछाडीची तक्रार नोंदवली आहे आणि त्यासंदर्भात तपास देखील चालू आहे. तक्रार करण्याऱ्या महिलेने कोणाचे नाव सांगितले नाही. 

एका इंग्रजी वृत्तवाहिनीमध्ये काम करणाऱ्या पत्रकार महिलेने ट्विटरच्या माध्यमातून झालेला प्रसंग सांगितला. ट्विटमध्ये तिने असे म्हटले आहे की, मी एक पत्रकार आहे. मला युवा काँग्रेसच्या रॅलीच्या वेळेस चुकीची वर्तवणूक मिळाली आणि याच रॅलीमध्ये कायद्याची व्यवस्था कायम ठेवण्यासाठी सरकार असमर्थ असल्याच्या घोषणा दिल्या जात होत्या. यावर युवा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता अमरीश रंजन पांडेय यांनी सांगितले की, गर्दीचा किंवा परिस्थितीचा कोणीतरी गैरफायदा घेतला आहे. त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.