एन.डी. तिवारींची ‘ग्रँडमस्ती’, महिलेसह डान्स जबरदस्ती

वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर पोहचलेले वयोवृद्ध नेते नारायण दत्त तिवारी आजकाल आपल्या विचित्र वागणुकीमुळे चर्चेत आहे. रविवारी लखनऊमध्ये शहीदांसाठी उदय भारत संस्थेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 23, 2013, 05:36 PM IST

24taas.com, झी मीडिया, लखनऊ
वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर पोहचलेले वयोवृद्ध नेते नारायण दत्त तिवारी आजकाल आपल्या विचित्र वागणुकीमुळे चर्चेत आहे. रविवारी लखनऊमध्ये शहीदांसाठी उदय भारत संस्थेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते.
मात्र, त्यांनी उधळलेल्या रंगामुळे उपस्थितांना आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. तसेच यावेळी आयोजकांचीही चांगली धावपळ झाली.
कार्यक्रमात शहिदांना देशभक्ती गीते, नाटक आणि नृत्याच्या माध्यमातून श्रद्धांजली देण्यात आली. या दरम्यान एन.डी. तिवारी व्यासपीठावर चढल आणि `कदम-कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा...` हे देशभक्ति गीत गाऊ लागले.
या वयस्कर नेत्याच्या वागणुकीमुळे उपस्थितांनी खूप टाळ्या वाजवल्या.
त्यामुळे एन.डी. तिवारी खूपच उत्साहीत झाले आणि व्यासपीठावर चक्क नाचायला लागले. नाचेपर्यंत ठिक होते. परंतु, त्या कार्यक्रमाच्या अडचणीची परिस्थिती तेव्हा निर्माण झाली जेव्हा कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्या एका महिलेला पकडून ते जबरदस्ती डान्स करायला लागले. आता टाळ्या वाजविणाऱ्या प्रेक्षकांनी तिवारींची हुर्या उडवली. आयोजकांची यावेळी चांगली धावपळ उडाली. कसे-बसे ‘जोशा’त आलेल्या तिवारींना आयोजकांनी आपल्या जागेवर बसवले. त्यानंतर मात्र बहुतांशी लोक हा विचित्र प्रकार पाहून निघून गेले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.