कल्याण

केडीएमसीच्या आयुक्तांना जाग, अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात

गेले काही महिने शांत असलेले केडीएमसी आयुक्त ई. रविंद्रन आता आक्रमक झालेत. कल्याण ते शीळफाटा या रस्त्यावरची अनधिकृत बांधकामं त्यांनी जमीनदोस्त केलीत. नवी मुंबईचे तुकाराम मुंढे आणि ठाण्याचे संजीव जयस्वाल यांच्या धडाकेबाज कारवाईनंतर रविंद्रन यांनाही आता जाग आल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झालीय.

Dec 8, 2016, 10:09 AM IST

ठाण्यानंतर नवीमुंबई, कल्याण-डोंबिवलीतही 'साफ-सफाई'

मात्र मुंबई महापालिका मात्र ढिम्मं आहे. कारवाईतला 'क'ही आयुक्त अजोय मेहता उच्चारत नाहीयेत.

Dec 7, 2016, 09:38 PM IST

कल्याण–मुरबाड–नगर रेल्वे सेवा सुरु करणार : मुख्यमंत्री फडणवीस

कल्याण–मुरबाड–नगर रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी लवकरच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासमेवत सर्व संबंधितांची बैठक घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जाहीर केलं. 

Dec 4, 2016, 07:45 AM IST

ISISमध्ये दाखल झालेला कल्याणमधील तरुण ठार

ISIS या दहशतवादी संघटनेत सामील असलेला कल्याणचा दहशतवादी अमन तांडेल हा एका हवाई हल्ल्यात मारला गेल्याची माहिती तुर्की देशातील एका अज्ञात व्यक्तीने दिली.

Nov 29, 2016, 07:59 AM IST

कल्याण येथे धावत्या रेल्वेवर दगड भिरकवल्याने प्रवासी जखमी

धावत्या लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर दगड भिरकावण्याचे प्रकार कितीही उपाय योजना केल्या तरी थांबत नाहीत. कल्याणच्या पत्रीपूलाजवळ या घटनेची पुनरावृत्ती शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेतून एक प्रवासी गंभीर जखमी झालाय. 

Nov 13, 2016, 05:24 PM IST

प्रेयसी आणि तिच्या बहिणीने फसवल्याने तरुणाची आत्महत्या

लग्नापूर्वीच प्रेयसी दुसऱ्या तरुणासोबत पळाली, त्यानंतर तिच्या बहिणीनेही दिला लग्नास नकार यामुळे निराश झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कल्याणच्या गोवंडी मोहल्ल्यात घडलीये.

Nov 8, 2016, 10:10 AM IST

कल्याणमध्ये विजेचा शॉक लागून अल्पवयीन मुलाचा मृत्यू

पूर्वेकडील कटेमानिवली जवळ 12 वर्षांच्या मुलाचा किल्ला बनविताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.

Oct 28, 2016, 02:45 PM IST

'सर्जिकल स्ट्राईकची किंमत भारताला चुकवावीच लागेल'

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतानं केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चा बदला आम्ही घेणार... सर्जिकल स्ट्राईकची किंमत भारताला चुकवावीच लागेल... अशी धमकी मिळाल्याची तक्रार कल्याणमधील महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीनं नोंदवलीय.

Oct 27, 2016, 09:35 PM IST