ISISमध्ये दाखल झालेला कल्याणमधील तरुण ठार

ISIS या दहशतवादी संघटनेत सामील असलेला कल्याणचा दहशतवादी अमन तांडेल हा एका हवाई हल्ल्यात मारला गेल्याची माहिती तुर्की देशातील एका अज्ञात व्यक्तीने दिली.

Updated: Nov 29, 2016, 08:01 AM IST
ISISमध्ये दाखल झालेला कल्याणमधील तरुण ठार title=

ठाणे : ISIS या दहशतवादी संघटनेत सामील असलेला कल्याणचा दहशतवादी अमन तांडेल हा एका हवाई हल्ल्यात मारला गेल्याची माहिती तुर्की देशातील एका अज्ञात व्यक्तीने दिली.

अमन तांडेल याच्या वडिलांना याबात एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. या घटनेमुळे कल्याणमध्ये पुन्हा खळबळ माजली आहे. ISIS या दहशतवादी संघटनेत कल्याण शहरातून इराकमध्ये गेलेले चार युवक मे २०१४ मध्ये सहभागी झाले होते. आरिफ माजिद, फहाद शेख, सहीम तानकी आणि अमन तांडेल अशी या तरुणांची नावं आहेत.

अमनच्या वडिलांनी त्याला नाव विचारले असता त्याने मला एवढीच माहिती तुमच्यापर्यंत देण्यासाठी सांगण्यात आल्याचे स्पष्ट करत फोन कट केला. दरम्यान त्याच्या नातेवाईकांनी फोन आला असल्याचं मान्य केलं असलं तरी अद्याप सुरक्षा यंत्रणांनी कुठलीही खातरजमा न केल्यानं ही बातमी खरी आहे का याबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.