ओडिशा

व्यापम घोटाळा : केंद्रीय निरीक्षकांचा संशयास्पद मृत्यू, ओडिशातील रेल्वे ट्रॅकवर मृतदेह

भाजपचे सरकार असलेल्या मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा उघड झाला. मात्र, या घोटाळ्यातील संशय अधिक गडद होत आहे. व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) गैरव्यवहार प्रकरणात आता आणखी एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आलेय.

Oct 17, 2015, 12:05 PM IST

सहावीत शिकणाऱ्या मुलीनं दिला बाळाला जन्म, २ अटक

ओडिशातील आदिवासी मुलींच्या वसतीगृहामध्ये सहावीत शिकणाऱ्या एका मुलीनं बाळाला जन्म दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. सहावीत शिकणारी अवघ्या १२-१३ वर्षाची मुलगी कुमारी माता बनल्यानं वस्तीगृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Feb 9, 2015, 09:02 PM IST

ओडिशात सापडल्या २० मानवी कवट्या

ओडिशामधील पुरी जिल्ह्यात तब्बल २० मानवी कवट्या सापडल्या आहेत.  रविवारी एका उड्डाणपुलाखाली कवट्यांसह पूजेचे काही साहित्य सापडलंय.

Nov 24, 2014, 05:29 PM IST

हुडहुडमुळे 24 जणांचा मृत्यू, पाहणीसाठी पंतप्रधान आज आंध्रला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हुडहुड चक्रीवादळानं झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विशाखापट्टणमला जातायेत. आंध्र प्रदेश आणि ओडिशा मधील समुद्र किनाऱ्यांवर वादळामुळं खूप नुकसान झालंय.  

Oct 14, 2014, 01:13 PM IST

आंध्र, ओडिशात हुडहुड वादळ, लोकांची धडधड वाढली

 सावधान हुडहुड वादळ आलंय...! होय हुडहुड वादळ तुफानी वेगानं भारताच्या आध्रं आणि ओडिशाच्या किनारपट्टीकडे कूच करतंय. हे वादळ विशाखापट्टनमच्या किनारपट्टीवर आज सकाळी धडकलंय. किनारपट्टीवर तुफानी वा-यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

Oct 12, 2014, 08:53 AM IST

'हुडहुड' चक्रीवादळचा धोका, आंध्र- ओडिशामध्ये अलर्ट

एका रंगीत चिमणीच्या नावावरून ‘हुडहुड’ हे नाव मिळालेलं चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीकडे वेगानं आगेकूच करतंय. येत्या १२ ऑक्टोबरला ते आंध्रात दाखल होण्याची तसंच या प्रदेशात शनिवारपासूनच जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

Oct 10, 2014, 08:07 AM IST

नरबळी: दुष्टशक्तींचा कोप टाळण्यासाठी जीभ कापून मुलाची हत्या

ओडिशाच्या बोलनगीर जिल्ह्यात सात वर्षाच्या मुलाची जीभ कापून नरबळी देण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. दुष्टशक्तींचा कोप टाळण्यासाठी अंधश्रद्धेपोटी हे कृत्य करण्यात आलं. 

Sep 29, 2014, 03:46 PM IST

बंगालच्या ‘सारदा चिटफंड’ घोटाळ्याची आता CBI चौकशी

पश्चिम बंगालमधील सारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आलेत. सुप्रीम कोर्टानं सीबीआयला चौकशीचे आदेश दिलेत. घोटाळ्यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाममधील लोकांचे २००० कोटी रुपये या चिट फंड घोटाळ्यात बुडाले आहेत.

May 9, 2014, 12:00 PM IST

<b>`फायलिन`ची तीव्रता कमी केली मुंबईतील प्राध्यापकाने! </b>

`फायलिन` हे चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. त्यामुळे खूप मोठी वित्त आणि जीवीत हानी होऊ शकते. याबाबतची कल्पना पाच दिवसांपूर्वीच कपिल गुप्ता या मुंबई आयआयटीच्या प्राध्यापकाने दिली होती. त्यामुळे लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात सरकारला यश आले आणि मोठी हानी टाळण्यात सरकार यशस्वी झाले आहे.

Oct 14, 2013, 01:53 PM IST

फायलीनचं संकट उंबरठ्यावर, तीन जणांचा मृत्यू

फायलीन चक्रीवादळ वेगाने भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. ‘फायलीन’ ओडिशामध्ये धडकण्यापूर्वीच वादळामुळे झाडं उन्मळून पडल्यानं तीन जणांचा मृत्यू झालाय.

Oct 12, 2013, 06:02 PM IST

फायलीन चक्रीवादळाचा वेग वाढलाय

फायलीन चक्रीवादळाचं काउंटडाऊन सुरु झाले आहे. फायलिनचा वेग आणखी वाढला आहे. हे वादळ ओडिशाच्या भोपालपूरपासून ३४५ किमी दूर आहे. आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय.

Oct 12, 2013, 09:50 AM IST

पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी!

भारताच्या पृथ्वी-२ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची ओडिशामधील चंडीपूर इथल्या तळावरून यशस्वी चाचणी करण्यात आलीय. पृथ्वी हे जमिनीवरून जमिनीवर हल्ला करणारं क्षेपणास्त्र असून ३५० किमीच्या पट्ट्यात ते मारा करू शकतं.

Oct 7, 2013, 11:46 AM IST

ओडिशातील अपहृत आमदाराची सुटका?

बिजू जनता दलाचे आमदार जिन्हा हिकाका यांची गुरूवारी सुटका करण्याचा निर्णय माओवाद्यांनी घेतला आहे. हिकाका यांना उद्या सकाळी दहा वाजता कोरपूट जिल्ह्यातील बलीपेटा गावात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Apr 25, 2012, 12:41 PM IST

ओडिशात माओवाद्यांकडून आमदाराचे अपहरण

ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाच्या आमदाराचे माओवाद्यांनी आज अपहरण केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुन्हा माओवाद्यांनी डोकेवर काढल्याचे दिसून येत आहे. याआधी परदेशी पर्यटकांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले आहे.

Mar 24, 2012, 10:58 AM IST