नरबळी: दुष्टशक्तींचा कोप टाळण्यासाठी जीभ कापून मुलाची हत्या

ओडिशाच्या बोलनगीर जिल्ह्यात सात वर्षाच्या मुलाची जीभ कापून नरबळी देण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. दुष्टशक्तींचा कोप टाळण्यासाठी अंधश्रद्धेपोटी हे कृत्य करण्यात आलं. 

Updated: Sep 29, 2014, 03:46 PM IST
नरबळी: दुष्टशक्तींचा कोप टाळण्यासाठी जीभ कापून मुलाची हत्या  title=

बोलनगीर (ओडिशा): ओडिशाच्या बोलनगीर जिल्ह्यात सात वर्षाच्या मुलाची जीभ कापून नरबळी देण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. दुष्टशक्तींचा कोप टाळण्यासाठी अंधश्रद्धेपोटी हे कृत्य करण्यात आलं. 

झालीपदार या गावातील त्या दुर्दैवी बालकाचं नाव दशरथ असून त्याचा मृतदेह जवळच्याच गंध्राबाध इथल्या एका तळ्यात आढळून आला.

तांत्रिक हृषिकेश दास, बानकाने बेहरा आणि अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली. दुष्टशक्तींना दूर ठेवण्यासाठीच हे कृत्य केल्याची कबुली बेहरा यानं दिली आहे. तांत्रिक दास यानं त्याला हा सल्ला दिला होता. 

दशरथ शुक्रवारी घराजवळ खेळत असताना या सर्वांनी त्याला खाऊ देण्याचं आमिष दाखवत बाजूच्या गावी नेलं. आरोपींनी त्याचे हात बांधून जीभ कापल्यानंतर त्याला तलावात फेकून दिलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.