www.24taas.com , वृत्तसंस्था, भूवनेश्वर
फायलीन चक्रीवादळाचं काउंटडाऊन सुरु झाले आहे. फायलिनचा वेग आणखी वाढला आहे. हे वादळ ओडिशाच्या भोपालपूरपासून ३४५ किमी दूर आहे. आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय.
वादळाच्या पार्श्वभूमीवर एक लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.. तसंच एनडीआरएफच्या २३ टीम्स तैनात करण्यात आल्यात. ओडिशात एकाही नागरिकाचा जीव जाऊ देणार नाही असं मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी म्हटलंय.
फायलिन चक्रीवादळामुळे ओडीशा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वा-यामुळे समुद्र खवळेला असेल त्यामुळे समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना तातडीने किना-यावर परतण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
सध्या हे चक्रीवादळ पश्चिमोत्तर दिशेने पुढे जात असून, हे वादळ ओडिशातील पारादीपपासून ८५० किलोमीटरवर केंद्रीत आहे. उद्या रात्री हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामानखात्यानं दिली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.