www.24taas.com, झी मीडिया, भुवनेश्वर, हैदराबाद
फायलीन चक्रीवादळ वेगाने भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. ‘फायलीन’ ओडिशामध्ये धडकण्यापूर्वीच वादळामुळे झाडं उन्मळून पडल्यानं तीन जणांचा मृत्यू झालाय. दुसरीकडे आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम, विजयनगरम आणि विशाखापट्टनम जिल्ह्यातील सखल भागांतील जवळजवळ एक लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.
फायलीन ओरिसात पोहोचण्यापूर्वीच तिघांचा बळी गेलाय. ओरिसातल्या गोपालपूरला फायलीनचा सर्वाधिक धोका आहे. तिथे तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे झालेल्या भूस्खलनामुळे तिघांचा म-त्यू झालाय. दरम्यान यामुळे ४ लाख ४६ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. ५६ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर १८ ट्रेनचे मार्ग बदललेत.

चक्रीवादळाचा तडाखा सर्वाधिक पूर्व किनारपट्टीवरच्या ओडिशा, आंध्रप्रदेश भागांना बसणार आहे. अगदी कोणत्याही क्षणी वादळ आंध्रप्रदेशासह ओडिसालात धडकेल. फायलीनचा सर्वाधिक धोका ओडिशातल्या गंजम जिल्ह्याला बसण्याची शक्यता आहे.
फायलिन चक्रीवादळामुळे ओडीशा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळेला असेल त्यामुळे समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना तातडीने किनाऱ्यावर परतण्याच्या सूचना देण्यात आल्यात. दरम्यान २३० ते २४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. फायलिन चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे विमानसेवेवरही परिणाम झालाय.. काही उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. तसंच प्रवाशांसाठी विमानतळावर व्यवस्था करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.