आरबीआय

RBIनं रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्यानं केली कपात, गृहकर्ज स्वस्त होणार

गृहकर्ज असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावेळी आरबीआयनं आपल्या क्रेडिट पॉलिसीमध्ये रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्यानं कपात केलीय. त्यामुळं आता रेपो रेट 6.75 टक्के झालाय.

Sep 29, 2015, 11:47 AM IST

1000 रुपयांची नोट होणार अधिक सुरक्षित

नविन सुरक्षा मानकांसह एक हजार रुपयांची चलनी नोट आपल्या नजरेत पडणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने लवकरच अशा नोटा सादर करण्याचा निर्णय घेतलाय. बनावट नोटा रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेय.

Sep 2, 2015, 04:06 PM IST

रिलायन्स, एअरटेल, व्होडाफोनला पेमेंट बँकेची आरबीआयची मान्यता

 रिझर्व्ह बँकेनं बुधवारी संध्याकाळी ११ पेमेंट बँकांचे परवान्यांना तत्वतः मान्यता दिलीय. यामध्ये पोस्ट खातं, रिलायन्स इंडस्ट्रीज, आदित्य बिर्ला नुव्हो, पेटीएम, टेक महिंद्रा, फिनो, एअरटेल कॉमर्स ,व्होडोफोन एम पैसा, अशा देशातल्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे.

Aug 20, 2015, 10:39 AM IST

आरबीआयकडून व्याजदरात कोणताही बदल नाही

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आज वार्षिक पतधोरणाचा तिसरा द्वैमासिक आढवा जाहीर केलाय. पतधोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

Aug 4, 2015, 11:45 AM IST

नोटांवर लिहिणं टाळा, 'आरबीआय'ची सूचना

भारतीय रिजर्व बँकेनं सामान्य लोकांना तसंच संस्थांना नोटेवर असणाऱ्या वॉटरमार्कच्या (नोट प्रकाशात धरल्यावर गांधींचा फोटो दिसतो ती रिक्त जागा) जागी कुठल्याही प्रकारचं लिखाण न करण्याची सूचना केली आहे.  

Jul 17, 2015, 03:22 PM IST

२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याचे अखेरचे आठ दिवस

आपल्याकडे २००५ पूर्वीच्या जुन्या नोटा असल्यास त्या लवकरात लवकर बदलून घ्या. कारण ३० जूननंतर त्या सर्व नोटा बाजारातून बाद करण्यात येणार आहेत. यामध्ये ५०० आणि १००० च्या नोटांचाही समावेश असून ते बदलून घेण्यासाठी शेवटचे फक्त आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर २००५ पूर्वीच्या सर्व नोटा चलनातून हद्दपार करण्यात येणार आहेत. 

Jun 22, 2015, 07:42 AM IST

सेन्सेक्समध्ये ६६० अंशांची घसरण

मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 660 अंशांनी कोसळून 27 हजार 188 पातळीवर व्यवहार करत बंद झाला आहे. तर, राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक 8 हजार 236.45 पातळीवर व्यवहार करत असून -196.95 अंशांनी कोसळून बंद झाला आहे.

Jun 2, 2015, 09:41 PM IST

'आरबीआय' म्हणजे 'चिअरलीडर' नाही : राजन

 रिझर्व्ह बँकेने  आज  जाहीर केलेल्या द्विमाही पतधोरणाच्या आढाव्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे. रिझर्व्ह रेपो दर आता 7.25 टक्के करण्यात आला आहे.

Jun 2, 2015, 09:00 PM IST

क्रेडिट पॉलिसी जाहीर, तुमच्या व्याज दरांत कपातीची शक्यता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपल्या व्याज दरांत 0.25 टक्के घट केलीय. त्यामुळे आता रेपो रेट 7.50 वरून 7.25 टक्क्यांवर पोहचलाय. 

Jun 2, 2015, 11:39 AM IST

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरकडून मोदींची पाठराखण

"जनतेने मोदी सरकारकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या असून कोणत्याही व्यक्तीकडून अशा अवास्तव अपेक्षा ठेवणे चुकीचेच आहे", असे सांगत रघुराम राजन यांनी मोदी सरकारची पाठराखण केली आहे.  

May 20, 2015, 07:45 PM IST