क्रेडिट पॉलिसी जाहीर, तुमच्या व्याज दरांत कपातीची शक्यता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपल्या व्याज दरांत 0.25 टक्के घट केलीय. त्यामुळे आता रेपो रेट 7.50 वरून 7.25 टक्क्यांवर पोहचलाय. 

Updated: Jun 2, 2015, 11:39 AM IST
क्रेडिट पॉलिसी जाहीर, तुमच्या व्याज दरांत कपातीची शक्यता title=

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपल्या व्याज दरांत 0.25 टक्के घट केलीय. त्यामुळे आता रेपो रेट 7.50 वरून 7.25 टक्क्यांवर पोहचलाय. 

सीआरआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आरबीआयच्या या बदलांमुळे गृहकर्जाच्या कर्जावरील हप्ता (ईएमआय) कमी होण्याची शक्यता आहे. 

रेपो रेटमध्ये कपात केल्यानं बँकांच्या व्याज दरांतही कमी होण्याची शक्यता आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, सीआरआर चार टक्क्यांवर कायम आहे. महागाईचा दर जानेवारी 2016 पर्यंत वाढून सहा टक्क्यांवर राहण्याची शक्यता आहे.

खाद्य नीतिचं (फूड पॉलिसी) व्यवस्थापन करताना भविष्य काळातील महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास आरबीआयनं व्यक्त केलाय. 

याचसोबत, सद्य स्थितीत गुंतवणूक मंदावल्याचंही आरबीआयनं म्हटलंय... व्याज दरांत आणखी कपातीसाठी वाट पाहावी लागेल, असंही आरबीआयनं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.