नवी दिल्ली : नविन सुरक्षा मानकांसह एक हजार रुपयांची चलनी नोट आपल्या नजरेत पडणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने लवकरच अशा नोटा सादर करण्याचा निर्णय घेतलाय. बनावट नोटा रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेय.
या नविन नोटांवर सुरक्षेबाबत नविन फिचर्स असणार आहे. १००० रुपयांच्या चिन्हाच्या आत ‘एल‘(L) हे अक्षर छापण्यात येणार आहे. तसेच नंबर पॅनेलवरील आकड्यांची चढत्या क्रमाने मांडणी करण्यात येणार आहे. आधी लहाननंतर मोठा याप्रमाणे मांडणी असेल. यामुळे नवीन नोट अधिक सुरक्षित होईल.
रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ‘एक हजार रुपयांच्या नोटांचा वापर अधिक सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी 500 रुपयांच्या चलनी नोटा सुरक्षा मानकांसह मर्यादित स्वरूपात छापण्यात आल्या आहे.
या नव्या नोटा आल्यानंतर ग्राहकांना खऱ्या व बनावट नोटांमध्ये फरक करणे सोपे होणार होईल. बनावट नोटा तयार होण्याच्या प्रक्रियेला आळा घालण्यासाठी अंकांची मांडणी चढत्या क्रमाने करण्यात आहे. त्यामुळे या नोटा पाहून नागरिकांनी विचलित होऊ नये, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटलेय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १०००च्या नोटेवर महात्मा गांधी सीरिज-२००५ प्रमाणे असेल. नविन मानक सुरक्षा १०० रुपयांच्या नोटांवर असा प्रयोग करण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.