नोटांवर लिहिणं टाळा, 'आरबीआय'ची सूचना

भारतीय रिजर्व बँकेनं सामान्य लोकांना तसंच संस्थांना नोटेवर असणाऱ्या वॉटरमार्कच्या (नोट प्रकाशात धरल्यावर गांधींचा फोटो दिसतो ती रिक्त जागा) जागी कुठल्याही प्रकारचं लिखाण न करण्याची सूचना केली आहे.  

Updated: Jul 17, 2015, 03:22 PM IST
नोटांवर लिहिणं टाळा, 'आरबीआय'ची सूचना title=

नवी दिल्ली: भारतीय रिजर्व बँकेनं सामान्य लोकांना तसंच संस्थांना नोटेवर असणाऱ्या वॉटरमार्कच्या (नोट प्रकाशात धरल्यावर गांधींचा फोटो दिसतो ती रिक्त जागा) जागी कुठल्याही प्रकारचं लिखाण न करण्याची सूचना केली आहे.  

आरबीआयनुसार या वॉटरमार्कच्या क्षेत्रात खूप महत्वपूर्ण अशी सुरक्षितता असते ज्यामुळं खोटी नोट आणि खरी नोट यातील फरक स्पष्ट करणं सोपं जातं. 
काही व्यक्ती किंवा संस्था नोटांच्या वॉटरमार्कच्या जागेवर संख्या, नाव तसंच संदेश लिहितात. यामुळं सुरक्षितता निकष कमकुवत होतात.
वॉटरमार्कच्या जागेवर एक महत्वपूर्ण सिक्युरिटी फीचर असतं जे नकली नोटांमध्ये आढळत नाही. या जागेवर काही लिखाण केल्यास हे फिचर लपून जातात. या फिचरची सामान्य लोकांना जाणीव नसते म्हणून कृपया या वॉटरमार्कच्या क्षेत्रात काहीही लिखाण करू नये, अशी सूचना आरबीआयनं जारी केली आहे.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.