मुंबई : मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 660 अंशांनी कोसळून 27 हजार 188 पातळीवर व्यवहार करत बंद झाला आहे. तर, राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक 8 हजार 236.45 पातळीवर व्यवहार करत असून -196.95 अंशांनी कोसळून बंद झाला आहे.
रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. त्यानंतर शेअर बाजारात मात्र सतत घसरण सुरुच आहे. दुपारच्या सत्रात शेअर बाजारातील घसरण अधिकच वाढली.
निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही प्रमुख निर्देशांक अनुक्रमे -2.34 टक्के आणि -2.37 टक्के कोलमडले आहेत. तर, स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक 1 टकक्याहून अधिक कोसळले आहे.
आज मुंबई शेअर बाजारात एचडीएफसी बँक, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले होते. बजाज ऑटो, मारुती सुझुकी किरकोळ घसरले होते. याशिवाय हिंदाल्को, सिप्ला, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि विप्रो यांचे शेअर्स प्रत्येकी 3 टक्क्यांनी घसरले होते.
रिझर्व्ह बँकेने आज जाहीर केलेल्या द्विमाही पतधोरणाच्या आढाव्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे. रिझर्व्ह रेपो दर आता 7.25 टक्के करण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.