भरघोस पेन्शन मिळूनही अजून आमदारांची हाव कायम!
माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये तब्बल 15 हजार रूपयांची भरघोस वाढ करण्यात आली असली तरी त्यांची `भूक` अजून संपलेली नाही. रेल्वे कूपन्स, राजमुद्रा असलेले लेटरहेड, एसईओचा दर्जा, पसंतीच्या व्यक्तीला पेन्शनचे लाभ अशा `पुरवणी मागण्या` या माजी आमदारांनी सुरूच ठेवल्या आहेत.
Aug 6, 2013, 05:39 PM ISTमाजी आमदारांच्या पेन्शनमध्ये भरघोस वाढ
राज्यातल्या माजी आमदारांच्या पेन्शनमधे भरघोस वाढ करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात कोणत्याही चर्चेविना हे विधेयक संमत करण्यात आलं. पेन्शनमध्ये तब्बल 15 हजारांची वाढ करण्यात आली.
Aug 5, 2013, 07:50 PM ISTपाच आमदारांचे निलंबन मागे
पोलीस सचिन सूर्यवंशी यांना पाच आमदारांनी मारहाण केली होती. मारहाण केलेल्या निलंबित आमदारांचे निलंबन मागे घेतल्याचे आज विधानसभेत करण्यात आली.
Jul 24, 2013, 12:59 PM IST`दोषी आमदार, खासदारांना निवडणूक बंदी`
जेलची सजा भोगून बाहेर आलेल्या आणि जेलमध्ये असणाऱ्यांना आता निवडणूक लढविता येणार नाही. असा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आमदार, खासदार यांनी दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा भोगली असेल तर त्यांनाही निवडणूक लढविता येणार नाही.
Jul 10, 2013, 03:59 PM ISTवाढदिवसाचं होर्डिंग हटवलं, आमदाराकडून मारहाण...
कल्याण (पूर्व) इथले राष्ट्रवादी पक्ष समर्थक आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका कर्मचाऱ्याला बेदम मारहाम केलीय.
Jun 14, 2013, 11:51 AM ISTपतंगराव आणि आमदार पवार यांच्यात खडाजंगी
सांगली जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत गोंधळ झाला आहे. पालकमंत्री पतंगराव कदम आणि आमदार संभाजी पवार यांच्यात खडाजंगी झाली.
May 14, 2013, 01:46 PM ISTमराठवाड्यासाठी सर्व आमदार एकत्र!
मराठवाड्यावरील होणारा अन्याय आता सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील सर्वच आमदार औरंगाबादेत एकत्र आले.
May 5, 2013, 10:05 PM ISTशिवसेना आमदार ओमराजेंचे एक वर्षासाठी निलंबन
विधानसभा उपाध्य़क्षांचा राजदंड पळवल्याप्रकरणी निंबाळकरांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Apr 16, 2013, 01:12 PM ISTबोंद्रे म्हणतात, 'दुष्काळग्रस्तांसाठीच उडवल्या नोटा...'
लढाणा जिल्ह्यातले चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी उडवलेल्या पैशांवर अजब खुलासा दिलाय. वाढदिवसानिमित्तानं उडवलेले पैसे दुष्काळग्रस्तांना दिल्याची सारवासारव केली
Apr 9, 2013, 11:56 PM ISTसाहेबांवर पाडला पैशांचा पाऊस, उडवल्या नोटा
अजित पवारांच्या असभ्य वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादाचा धुराळा खाली बसत असतानाच, राजकीय नेत्यांच्या निर्ढावलेल्या पणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार बुलढाण्यात उघडकीस आलाय.
Apr 9, 2013, 03:58 PM ISTअधिकाऱ्यांना चोपणारे आमदार करणार सूर्यवंशींच्या मारहाणीची चौकशी!
मंत्रालयातील पीएसआय मारहाणप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार आर एम वाणी यांचाही समावेश आहे. मात्र याच महोदयांनी त्यांच्या मतदारसंघातही अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची अनेक प्रकरणं आहेत. त्यामुळे असे आमदार काय चौकशी करणार असा सवाल आता केला जात आहे.
Mar 31, 2013, 05:58 PM ISTपोलिसाला मार, आमदारांना कोठडी,आमदाराला मार, पोलिसांना बढती
राज्यात कायद्याचे राज्य आहे कायद्याचं असे उर बडवून फिरणाऱ्या राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अजब कारभार उघड झाला आहे. पोलिसाला चोप देणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले, पण आमदारांना लाठ्याकाठ्यांनी झोडपणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना बढती दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
Mar 25, 2013, 11:40 AM ISTखाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं!
राज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. पीएसआय सचिन सुर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळू शकलेला नाही.
Mar 24, 2013, 07:08 PM ISTशरद पवारांनी दिल्या कानपिचक्या
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकाच गाड्याच्या दोन बाजू आहेत. गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे महाराष्ट्रात एक चाक निखळून पडते आहे की काय, याची चिंता केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी व्यक्त करताना पोलीस आणि आमदारांमध्ये सुरु असलेल्या वादावर टीप्पणी केलीय. यावेळी शरद पवारांनी दोघांनाही खडे बोल सुनावले.
Mar 24, 2013, 11:30 AM ISTदोन्ही आमदार जाणार `जेल`मध्ये....
आमदार राम कदम आणि क्षितीज ठाकूर यांना मारहाण प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र त्याचसोबत या दोन्ही आमदारांना २ दिवस ऑर्थर रोड जेलमध्ये काढावे लागणार आहेत.
Mar 22, 2013, 05:09 PM IST