माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये भरघोस वाढ

राज्यातल्या माजी आमदारांच्या पेन्शनमधे भरघोस वाढ करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात कोणत्याही चर्चेविना हे विधेयक संमत करण्यात आलं. पेन्शनमध्ये तब्बल 15 हजारांची वाढ करण्यात आली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 5, 2013, 07:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातल्या माजी आमदारांच्या पेन्शनमधे भरघोस वाढ करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात कोणत्याही चर्चेविना हे विधेयक संमत करण्यात आलं. पेन्शनमध्ये तब्बल 15 हजारांची वाढ करण्यात आली.
विधीमंडळ अधिवेशनात प्रत्येक गोष्टीवर एकमेकांसमोर उभे राहणारे सत्ताधारी आणि विरोधक यांचं एका गोष्टीवर मात्र एकमत झालं. माजी आमदारांच्या पेन्शनात भरघोस वाढ करून घेण्यात आली. तसं विधेयक पावसाळी अधिवेशनात संमतही झालं.
राज्यातल्या माजी आमदारांना 25 हजार रूपये पेन्शन मिळत होतं. त्यात तब्बल 15 हजारांची वाढ करून ते 40 हजार करण्यात आलं.. विशेष म्हणजे हे विधेयक संमत करून घेण्यासाठी कोणतीही चर्चा झाली नाही. याला कोणी विरोधही केला नाही..
विरोध न करण्याचं कारण अगदी सरळ होतं. सदनातला प्रत्येक आमदार या घसघशीत वाढ झालेल्या पेन्शनला पात्र होणार आहे. मग त्याला विरोध करणार कसा?
संकटग्रस्त शेतकऱ्यांनाही सरकारकडून एवढ्या तडकाफडकी मदतीची घोषणा होत नाही. मात्र आमदारांच्या पेन्शनवाढीबाबत कोणत्याही विरोधाशिवाय तात्काळ निर्णय घेतला जातो याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.