www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
मराठवाड्यावरील होणारा अन्याय आता सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील सर्वच आमदार औरंगाबादेत एकत्र आले. जायकवाडीत भिकेचे पाणी नको तर हक्काचे पाणी हवे आणि ते सरकारला द्यावेच लागेल अशी भूमिका आज मराठवाड्यातील आमदारांनी घेतली.
जलसमान न्याय वाटप कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी आणि मराठवाड्यातील अर्धवट सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची एकमुखी मागणी या आमदारांनी केलीय.. मुख्यमंत्र्यांनी तातडीने मागणी मान्य न केल्यास मराठवाड्यातील सर्वच आमदार आता रस्त्यावर उतरण्याची भाषा करु लागले आहेत. मराठवाड्यात एकून 50 आमदार आहेत. मात्र मराठवाड्याच्या हक्काच्या लढाईचे रणशिंग फुंकण्यासाठी फक्त 12 आमदारांनी हजेरी लावली.
खरंतर राजकीय नेतृत्वाबात मराठवाडा नेहमीच कमनशिबी ठरलाय. मात्र पाण्याच्या लढाईसाठी एकत्र आलेले 12 आमदार आम्हाला सर्वंच आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगत आहे. त्यामुळे आता मराठवाड्याची पाण्याची लढाई मोठ रुप घेणार असच चित्र निर्माण झालय..