मनसे आमदार राम कदमांवर अॅट्रॉसिटी
घाटकोपर मतदारसंघाचे मनसेचे आमदार राम कदम यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apr 22, 2014, 03:47 PM ISTदीपक केसरकरांचा आमदारकीचा राजीनामा, तर बाळा भिसेंची हकालपट्टी
कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केसरकरांचा राजीनामा मागितल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिलीय. प्रदेशाध्यक्षांच्या सभेला गैरहजर राहिल्यामुळं केसरकरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.
Apr 13, 2014, 01:40 PM IST१० वर्षात एकाही आमदार, खासदाराविरुद्ध खटला नाही?
गेली दहा वर्षे राज्यातील एकाही आमदार किंवा खासदाराच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी विधानसभा अध्यक्ष किंवा लोकसभा अध्यक्षांकडे पोलीसांनी मागितली नाहीये. यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आमदार-खासदार य़ांच्यावरील गुन्ह्याचं काय असा सवाल आता उपस्थित झालाय.
Mar 17, 2014, 10:10 AM ISTराष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना पत्नीसह अटक
इन्कम टॅक्सच्या बनावट दाखल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना शिवाजीनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यानंतर कोर्टानं त्यांची २० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केलीय.
Dec 13, 2013, 09:20 PM ISTराष्ट्रवादीच्या चार आमदारांचे राजीनामे; मुख्यमंत्र्यांवर दबाव?
पिंपरी-चिंडवडमधल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्या चांगलाच पेटलाय. पुणे आणि पिंपरीमधल्या राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी राजीनामे दिलेत.
Dec 9, 2013, 10:29 PM ISTगृहमंत्र्यांना बूट फेकून मारला... आणि बनला दिल्लीचा आमदार!
पी. चिदंबरम हे देशाचे गृहमंत्री असताना त्यांना एका शीख तरुणानं भर पत्रकार परिषदेत बूट फेकून मारला होता... तो प्रसंग आणि तो तरुण तुम्हाला आठवतो का?... आता का बरं हा प्रसंग आणि त्या तरुणाचा चेहरा आत्ता का आठवावा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? तर... त्याचं कारण म्हणजे, हाच पी. चिंदबरम यांना बूट फेकून मारणारा शीख तरुण आता दिल्लीचा आमदार झालाय.
Dec 9, 2013, 09:14 PM IST२६/११ हल्ल्यातील अपंग कमांडो झाला दिल्लीचा आमदार!
मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा दलाचा कमांडो सुरेंदर सिंग यांनी दहशतवाद्यांचा खात् माकरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूकीत ‘आम आदमी पार्टी’च्या तिकिटावर दिल्ली कॅण्टोन्मेंट मतदारसंघातून लढवली.
Dec 9, 2013, 03:01 PM ISTआमदाराच्या पत्नीची हत्या
उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे आमदार हाजी अलीम यांच्या पत्नीची आज सकाळी दिल्लीत त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. चाकूसारख्या धारदार शस्त्राने ही हत्या केली गेल्याची शंका व्यक्त होत आहे.
Oct 9, 2013, 08:23 PM ISTबँकेत ४१२ कोटींचा घोटाळा, मनसे आमदार अडचणीत?
‘मुंबै बँके’मध्ये सुमारे 412 कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे अंतरिम तपासणी अहवालात उघडकीस आले आहे. मुंबै बँकेचे अध्यक्ष मनसेचे आमदार प्रवीण दरेकर आणि संचालक शिवाजी नलावडे यांच्यासह अन्य संचालकांवरही फौजदारी कारवाई करण्याची शिफारस अहवालात करण्यात आलीय.
Oct 2, 2013, 08:40 PM ISTअमरावतीच्या आमदारांना स्टेजवर थोबाडले
अमरावती येथे चक्क आमदार साहेबांनाचा मार खावा लागला. दहीहंडीचा काल उत्सव सुरू होता. याचवेळी दहीहंडी बक्षीस वितरण कार्यक्रमात एकाने घुसखोरी केली आणि आमदारांना जोरदार धप्पड मारली. या प्रकाराने कार्यक्रमात गोंधळ उडाला.
Aug 30, 2013, 10:07 AM ISTसेक्स रॅकेट : बारमध्ये आमदाराला सहा कॉलगर्लसह अटक
उत्तर प्रदेशमधला समाजवादी पक्षाचा आमदार महेंद्र कुमार सिंहला गोव्यात सहा कॉलगर्लसह अटक करण्यात आलीय. गोवा पोलिसांनी पणजीतल्या व्हिवा गोवा हॉटेलवर छापा टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
Aug 28, 2013, 09:30 AM ISTमुंडेंची पंकजा पोलिसांच्या ताब्यात!
मुंबईतला सामूहिक बलात्कार आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी भाजपनं पुण्यात जोरदार आंदोलन केलं. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यक्रमात निदर्शनं करण्यात आली. आंदोलनानंतर आमदार पंकजा मुंडे-पालवे यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
Aug 25, 2013, 04:10 PM ISTशिवसेना आमदाराची महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ
आमदार कदम यांना टोलची पावती फाडण्यास सांगितल्याचा राग आला आणि त्यांनी महिला कर्मचाऱ्य़ांना आई-बहिणींवरून शिव्या देत थेट कपडे उतरवण्याची धमकी दिली. आपल्या सांगण्यावरून जर गाडी सोडली नाही, तर कर्मचारी महिलांना कपडे उतरवायला लावेन अशा गलिच्छ शब्दांत महिलांना धमकी दिली.
Aug 22, 2013, 08:17 PM ISTआमदार मारहाणीनंतर सूर्यवंशींची मुंबईबाहेर बदली
आमदार मारहाण प्रकरणातील पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली आहे. वरळी वाहतूक पोलीस शाखेतून सांगलीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांची बदली झाली.
Aug 9, 2013, 12:29 PM ISTविधानसभेत आमदारांचं `ये रे माझ्या मागल्या...`
विधानसभेचं पावसाळी अधिवेशन विविध करणांनी चांगलंच गाजलं. पण हे आंदोलन जनतेसाठी निराशाजनकच ठरलं. पिंपरी चिंचवड करांसाठी तर, ये रे माझ्या मागल्या सारखं हे अधिवेशन आलं आणि गेलं.
Aug 6, 2013, 08:44 PM IST