IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ही जगातील सर्वात मोठी टी 20 लीग असून याच्या 18 व्या सीजनसाठी नुकतंच मेगा ऑक्शन पार पडलं. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या या मेगा ऑक्शनमध्ये ऋषभ पंत हा भारताचा स्टार विकेटकिपर आणि फलंदाज आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. लखनऊ सुपर जाएंट्सने त्याच्यावर तब्बल 27 कोटी खर्च करून विकत घेतले. लखनऊच्या फ्रेंचायझीने पंतसाठी एवढी मोठी रक्कम मोजल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटलं, मात्र ऋषभसाठी लखनऊने एवढी मोठी बोली का लावली याच कारण संघाचे मालक संजीव गोयंका (Sanjay Goenka) यांनी एका मुलाखतीतून सांगितलं आहे.
ऋषभ पंत 2016 पासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. मागील काही वर्षात त्याने कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व सुद्धा केलं होतं. मात्र आयपीएल 2025 साठी दिल्लीने त्याला रिटेन केलं नाही आणि तो मेगा ऑक्शनमध्ये आला. ऋषभ पंतने स्वतःला 2 कोटींच्या बेस प्राईजवर ठेवले होते. आयपीएल 2024 मेगा ऑक्शनच्या पहिल्याच दिवशी पंत ऑक्शन टेबलवर आला. यावेळी त्याच्यासाठी अनेक संघांनी बोली लावली यात दिल्ली कॅपिटल्स, केकेआर आणि लखनऊ सुपर जाएंट्स आघाडीवर होते. पंतची बोली ही 20 ते 21 कोटींच्या दरम्यान सुरु असताना लखनऊने त्यांना घेण्याचं ठरवलं. त्यानंतर दिल्ली आरटीएम कार्ड वापरून पंतला त्याच पैशांमध्ये खरेदी करायला तयार होती. परंतु त्याचवेळी लखनऊ संघाचे मालक संजय गोयंका यांनी थेट 27 कोटींची बोली लावली, ज्यामुळे सर्वच चकित झाले. ऋषभ पंतवर लावलेली 27 कोटींची बोली ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली होती.
हेही वाचा : Google Search 2024 च्या सर्च लिस्टमध्ये 'अकाय' चा बोलबाला, विराट-अनुष्काच्या लेकाच्या नावाचा अर्थ काय?
Sanjiv Goenka said, the reason we raised the bid to 27cr for Rishabh Pant was because we knew that DC owner Parth Jindal is crazy for Pant and if he can bid 26.5cr for Shreyas Iyer then he&39;ll definitely go raise 26.75cr for Rishabh. (TRS). pic.twitter.com/LXliEViwWq
— Mufaddal Vohra (mufaddal_vohra) December 12, 2024
लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजय गोयंका यांना मुलाखतीत ऋषभ पंतवर 27 कोटींची बोली का लावली असा प्रश्न विचारण्यात आला. यावर गोयंका म्हणाले, 'आम्ही ऋषभ पंतची बोली 27 कोटींपर्यंत वाढवली याच कारण आम्हाला माहित होतं की दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदल हे पंतसाठी खूप वेडे आहेत. आणि जर ते श्रेयस अय्यरसाठी 26.5 कोटींची बोली लावू शकतात तर ऋषभसाठी ते 26.75 कोटींची बोली लावूच शकले असते'.
यंदाचं ऑक्शन सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पार पडलं असून यात 577 खेळाडूंवर बोली लागली तर यापैकी 182 खेळाडूंवर पैसे खर्च करून फ्रेंचायझींनी त्यांना संघात घेतले. तर उर्वरित सर्व खेळाडू हे अनसोल्ड ठरले. दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडताना मंगळवारी ऋषभ पंतने इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिली. यासोबत त्याने एक व्हिडीओ देखील शेअर केला, ज्याला त्याने 'तू आती है सीने में, जब-जब सांसे भरता हूं...' हे गाणं मागे लावलं होतं. 26 वर्षीय पंतने दिल्ली सोबत त्याचा 9 वर्षांचा प्रवास आठवला आणि त्याने आपल्या व्हिडीओची सुरुवात 'ऐ दिल्ली वालो, मैं ऋषभ पंत...' अशी केली.