ऍडलेड : चेतेश्वर पुजाराचं शतक आणि भारताच्या भेदक बॉलिंगमुळे पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया अडचणीत सापडली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर १९१/७ एवढा होता. दिवसाअखेर ट्रेव्हिस हेड ६१ रनवर नाबाद आणि मिचेल स्टार्क ८ रनवर नाबाद खेळत आहेत. भारताकडून आर.अश्विनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. अर्धशतक करणारा ट्रेव्हिस हेड ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू आहे.
क्रिकेटच्या मैदानात स्लेजिंग करण्याची परंपरा खरंतर ऑस्ट्रेलियाची आहे. पण यावेळी मात्र भारतानंच ऑस्ट्रेलियाचं स्लेजिंग केल्याचं पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियाच्या इनिंगच्या ५८व्या ओव्हरमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला काहीतरी म्हणाला. ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन हॅण्ड्सकॉम्ब आऊट झाल्यानंतर टीम पेन बॅटिंगला आला. पेननं पहिला बॉल खेळल्यानंतर स्लिपमध्ये फिल्डिंगला उभा असलेला विराट त्याला काहीतरी म्हणाला.
— Mr Gentleman (@183_264) December 7, 2018
यानंतर ईशांत शर्माच्या बॉलिंगवर टीम पेननं विकेट कीपर ऋषभ पंतच्या हातात कॅच दिला. पेन आऊट झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था ६ विकेटवर १२७ अशी होती. टीम पेनला २० बॉलमध्ये ५ रनच करता आले.
Ishant Sharma got rid of the skipper to further derail Australia's innings!
1st Test LIVE on SONY SIX and SONY TEN 3 (also in HD).#ChhodnaMat #AUSvIND #SPNSports pic.twitter.com/uFOCBOUEfa
— SPN- Sports (@SPNSportsIndia) December 7, 2018
भारताचा विकेट कीपर ऋषभ पंतनंही ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाचं स्लेजिंग केलं. सगळेच जण पुजारा नसतात, असं ऋषभ पंत ख्वाजाला म्हणाला. ऋषभ पंतचं हे वक्तव्य स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झालं.
— Mr Gentleman (@183_264) December 7, 2018
उस्मान ख्वाजाची विकेट घेताना डीआरएस वापरण्यासाठीही ऋषभ पंतनंच विराटची मदत केली. उस्मान ख्वाजाच्या बॅटला बॉल लागल्याचा पंतला विश्वास होता, पण अंपायर कुमार धर्मसेना यांनी आऊट दिलं नाही. अखेर पंतनं कर्णधार विराट कोहलीला डीआरएस घ्यायला लावला. डीआरएसमध्ये उस्मान ख्वाजाच्या हाताला बॉल लागल्याचं दिसल्यामुळे त्याला आऊट देण्यात आलं. १२५ बॉलमध्ये २८ रन करून ख्वाजा आऊट झाला.
India used the DRS to good effect after Ashwin got some of Khawaja's glove with this gem!
1st Test LIVE on SONY SIX and SONY TEN 3 (also in HD).#ChhodnaMat #AUSvIND #SPNSports pic.twitter.com/Vn2vz3xUhU
— SPN- Sports (@SPNSportsIndia) December 7, 2018
एवढच नाही तर ऋषभ पंत विकेट कीपिंग करत असताना अश्विनलाही सल्ला देत होता. ट्रेव्हिस हेड बॅटिंग करत असताना पंतनं अश्विनला शॉर्ट बॉलिंग करु नकोस असं सांगितलं. शॉर्ट बॉल टाकू नकोस, तो शॉर्ट बॉलचीच वाट पाहतोय, असं तो म्हणाला. ऋषभ पंतचा हा आवाजही मायक्रोफोनमध्ये कैद झाला.