ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारतीय बॉलरनी जोरदार पुनरागमन केलं आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं ७ विकेट गमावून १९१ रन केले होते. दिवसाअखेर ट्रेव्हिस हेड ६१ रनवर नाबाद आणि मिचेल स्टार्क ८ रनवर नाबाद खेळत आहेत. भारताकडून आर.अश्विनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. अर्धशतक करणारा ट्रेव्हिस हेड ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू आहे.
या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शनं १३० वर्षातल्या लाजीरवाण्या रेकॉर्डची नोंद केली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथवर बंदी घातल्यानंतर शॉन मार्शकडून जबाबदारपूर्ण कामगिरीची अपेक्षा करण्यात आली होती. पण मार्शचा फॉर्म मात्र दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. स्मिथ आणि वॉर्नरवर बंदी घालण्यात आल्यानंतर मार्शनं टेस्टच्या प्रत्येक इनिंगमध्ये १६, ७, ७, ०, ३, ४ आणि २ असा स्कोअर केला आहे. १८८८ पासून कधीच ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या ५ बॅट्समनपैकी एक एवढेवेळा लागोपाठ एक अंकी स्कोअरवर आऊट झाला आहे.
Ashwin with the breakthrough after lunch and SMarsh has to go.
Live coverage HERE: https://t.co/lTUqyqRMzW #AUSvIND pic.twitter.com/BYFnZKoDWn
— cricket.com.au (@cricketcomau) December 7, 2018
मार्शनं ऍशेसमध्ये इंग्लंडविरुद्ध १५६ रन केले होते. यानंतरच्या १३ इनिंगमध्ये त्याला एकदाही ४० रनपेक्षा जास्त स्कोअर करता आला नाही. आर.अश्विननं मार्शला २ रनवर बोल्ड केलं.